IPL 2025 DC vs RCB Highlights: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सकडून चिन्नास्वामीच्या मैदानावरील पराभवाचा बदला घेत शानदार विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सवरील विजयासह आरसीबीने १४ गुणांसह गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. विराट कोहली आणि कृणाल पंड्याच्या ११९ धावांच्या भागीदारीच्या जोरीवर आरसीबीने दिल्लीने दिलेल्या १६४ धावांचे लक्ष्य ८ चेंडू राखून पूर्ण केले.

Live Updates

IPL 2025 Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru Highlights: आयपीएल २०२५ दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे हायलाईट्स

23:15 (IST) 27 Apr 2025
DC vs RCB Live: टीम डेव्हिडची वादळी खेळी

टीम डेव्हिडने १९ व्या षटकात १७ धावा करत आरसीबीला दिल्लीवर विजय मिळवू दिला आहे. आरसीबीने दिल्लीचा त्यांच्या घरच्या मैदानावर ६ विकेट्सने मोठा पराभव केला आहे. टीम डेव्हिडने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार अन् तो नो बॉल ठरला. फ्री हिटवरही डेव्हिडने चौकार लगावला. तर तिसऱ्या चेंडूवर डेव्हिडने चौकार लगावत संघाचा विजय एक षटक राखून निश्चित केला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

23:09 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB Live: विराट कोहली झेलबाद

१८व्या षटकात दुश्मंता चमीराने चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला झेलबाद केलं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यासह आरसीबीला विजयासाठी १२ चेंडूत १७ धावांची गरज आहे.

22:58 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB Live: विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीचं आयपीएल २०२५ मध्ये सलग तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. चेस मास्टर विराटने परिस्थितीप्रमाणे खेळी करत ४५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान कोहलीने ४ चौकार लगावले.

22:48 (IST) 27 Apr 2025
DC vs RCB Live: कृणाल पंड्याचं अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध दिल्लीच्या कठिण खेळपट्टीवर फलंदाजी करताना कृणाल पंड्याने महत्त्वपूर्ण खेळी खेळत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. ३८ चेंडूत पंड्याने ४ षटकार आणि २ चौकारांसह ५३ धावा करत आपलं अर्धशतक केलं आहे. आता दिल्लीला ३० चेंडूत ४९ धावांची गरज आहे.

22:36 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB Live:१२ षटकांत ३ बाद ७८ धावा

आरसीबीने कृणाल पंड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर १२ षटकांत ३ बाद ७८ धावा केल्या आहेत. आता आरसीबीला विजयासाठी ४८ चेंडूत ८५ धावांची गरज आहे. याआधी आरसीबी दिल्ली एकमेकांसमोर आले होते, तेव्हा राहुलने अखेरच्या षटकांमध्ये वादळी खेळी करत संघाला चिन्नास्वामीच्या मैदानावर विजय मिळवून देत अनोखं सेलिब्रेशन केलं होतं, पण आता विराटही हिच कामगिरी करणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

22:04 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB Live: पावरप्ले

पावरप्लेमध्ये आरसीबीने सावध सुरूवात केली आहे. पावरप्लेच्या ६ षटकात आरसीबीला ३ गडी बाद ३५ धावा करता आल्या आहेत.

21:57 (IST) 27 Apr 2025
DC vs RCB Live: आरसीबीला तिसरा मोठा धक्का

धावांचा पाठलाग करताना रजत पाटीदारवर मोठी जबाबदारी होती. मात्र करूण नायरच्या शानदार थ्रो मुळे त्याला अवघ्या ६ धावांवर माघारी परतावं लागलं आहे.

21:48 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: अक्षर पटेलचे २ विकेट

तिसऱ्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्या चार चेंडूवर २ विकेट घेत आरसीबीला मोठा धक्का दिला. दुसऱ्या चेंडूवर चांगली फटकेबाजी केलेला जेकब बेथल झेलबाद झाला. तर चौथ्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल क्लीन बोल्ड झाला.

21:20 (IST) 27 Apr 2025
DC vs RCB LIVE: अखेरच्या षटकात भुवनेश्वरची भेदक गोलंदाजी

ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगमने १९व्या षटकात १९ धावा करत धावसंख्येत भर घातली होती. पण भुवनेश्वरच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर विपराज निगम दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. तर पाचव्या चेंडूवर स्टब्सला झेलबाद करत मोठी विकेट मिळवली. यासह दिल्लीने चांगलं कमबॅक करत २० षटकांत ८ बाद १६२ धावा केल्या आहेत. १७ व्या षटकापर्यंत दिल्लीची धावसंख्या १२० होती. तर दिल्लीने १८व्या षटकात १७ आणि १९व्या षटकात १९ धावा करत मोठी धावसंख्या रचली. यासह दिल्लीने आरसीबीला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले आहे.

21:03 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: आशुतोष शर्मा क्लीन बोल्ड

१७व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या चेंडूवर राहुलला बाद केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्माला पाचव्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं.

21:01 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: केएल राहुल झेलबाद

टाईमआऊटनंतर १७व्या षटकात भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळवली. केएल राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. राहुल ३९ चेंडूत ३ चौकारांसह ४१ धावा करत आऊट झाला.

20:52 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: अक्षर पटेल क्लीन बोल्ड

१४व्या षटकात हेझलवुडने चौथ्या चेंडूवर कर्णधार अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. अक्षर पटेल १५ धावा करत बाद झाला. यासह दिल्लीने १५ षटकांत ४ बाद १०८ धावा केल्या आहेत.

20:37 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: १० षटकांत इतक्या धावा

दुखापतीनंतर परतल्यानंतर फाफ डू प्लेसिस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. प्लेसिस २२ चेंडूत २ चौकारांसह २६ धावा करत बाद झाला. यासह दिल्लीने १० षटकांत ३ बाद ७२ धावा केल्या आहेत. आरसीबीच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली.

20:20 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: करूण नायर अपयशी

चांगल्या सुरूवातीनंतर करूण नायर गेल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलाय. यश दयालच्या गोलंदाजीवर करूण नायर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह ५ षटकांत दिल्लीने २ बाद ४५ धावा केल्या आहेत.

19:52 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: अभिषेक पोरेल आऊट

हेझलवूड चौथ्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने विकेट मिळवून दिली. हेझलवूडच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. यासह आरसीबीला पहिला ब्रेकथ्रू मिळाला.

19:50 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: भुवनेश्वरच्या षटकात फटकेबाजी

दिल्लीकडून फाफ डू प्लेसिस आणि अभिषेक पोरेल सलामीसाठी उतरले होते. अभिषेक पोरेलने भुवनेश्वरच्या तिसऱ्या षटकात २ षटकार लगावत १७ धावा केल्या. यासह दिल्लीने चांगली सुरूवात करत ३ षटकांत ३२ धावा केल्या.

19:07 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: दिल्लीची प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकिपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

19:06 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: आरसीबीची प्लेईंग इलेव्हन

विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

19:02 (IST) 27 Apr 2025
DC vs RCB LIVE: नाणेफेक

दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नाणेफेक आरसीबीने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिल सॉल्ट आजारी असल्याने त्याच्या जागी जेकब बेथल खेळताना दिसणार आहे.

18:50 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

क्षर पटेल (कर्णधार), करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव

18:49 (IST) 27 Apr 2025

DC vs RCB LIVE: आरसीबीचा संपूर्ण संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड

IPL 2025 DC vs RCB Highlights: आरसीबीने दिल्लीकडून मागील पराभवाचा बदला घेत शानदार विजय मिळवला आहे.