Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Score Updates: शनिवारच्या (दि. ६ मे) डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या विराट कोहलीने त्याच्या होम ग्राऊंडवर शानदार अर्धशतक झळकावले. त्याचसोबत महिपाल लोमरोरने आक्रमक फटकेबाजी करत आपले आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. त्या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्ससमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी आयपीएल २०२३च्या या ५०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत बंगळुरू संघ गुणतालिकेतील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करणार, दुसरीकडे दिल्ली संघ स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात केदार जाधव याची एन्ट्री झाली आहे. तसेच, दिल्ली कॅपिटल्स संघात मायदेशी गेलेल्या ऑनरिक नॉर्खियाच्या जागी मुकेश कुमार संघात परतला आहे, तर इतर परदेशी खेळाडू म्हणून मिचेल मार्शचा संघात समावेश आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. दिल्लीला १८२ धावांचे कठीण लक्ष्य मिळाले आहे. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्याच्याशिवाय महिपाल लोमरोरनेही अर्धशतक झळकावले. महिपालने २९ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. महिपालचा स्ट्राइक रेट १८६.२१ राहिले. कर्णधार फाफ डुप्लेसिसने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. दिनेश कार्तिकने ११ आणि अनुज रावतने नाबाद आठ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल खातेही उघडू शकला नाही. दिल्लीकडून मिचेल मार्शने दोन बळी घेतले. खलील अहमद आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

आयपीएलमध्ये ७००० धावा करणारा भारतीय फलंदाज

बंगळुरूने आपला शेवटचा सामना लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध खेळला होता. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवला होता. विराट कोहली या सामन्यात ३० चेंडूत ३१ धावांचे योगदान देऊ शकला. या ३१ धावांच्या खेळीनंतर विराटच्या आयपीएल धावांचा आकडा 6988 झाला होता. शनिवारी (६ मे) दिल्ली कॅफिटल्सविरुद्ध विराटने १२ धावा करताच आपल्या ७००० धावा आयपीएल धावा पूर्ण केल्या. या धावा विराटने २३३ सामन्यांमधील २२५ डावांमध्ये केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – ७०००+ (२२५डाव)
शिखर धवन – ६५३६ (२१२डाव)
डेविड वॉर्नर – ६१८९(१७१डाव)
रोहित शर्मा – ६०६३(२३२डाव)

हेही वाचा: WTC Final: के. एल. राहुलच्या जागी टीम इंडियात कोणाची लागणार वर्णी? शर्यतीत सरफराज-इशान किशनसह ‘या’ पाच खेळाडूंचा समावेश

हे आहेत दोन्ही संघांची प्लेइंग-११

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिले रुसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), केदार जाधव, वनिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc vs rcb score bangalore gave delhi a target of 182 runs half centuries from virat kohli and mahipal lomror avw
Show comments