IPL 2022 DC vs SRH Playing XI :आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज(गुरुवार) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर सामना सुरू होणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ ९ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ ९ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला मागील दोन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. मागील सामन्यात हैदराबादला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दिल्लीच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये शॉ ची कामगिरी चांगली राहिलेली नाही. संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी दोघांवर असेल. याशिवाय मधल्या फळीत मिचेल मार्श, ऋषभ पंत आणि ललित यादव असतील. तसेच संघात रोवमन पॉवेल, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू आहेत. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर कुलदीप यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. मुस्तफिजुर रहमानने सातत्याने चांगली कामगिरी केलेली नाही. या सामन्यात चेतन साकारियाच्या जागी खलील अहमदचे पुनरागमन होऊ शकते.

हैदराबादबद्दल बोलायचे तर केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. याशिवाय राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन आहे. वॉशिंग्टन सुंदर जखमी आहे. त्याच्या जागी जगदीश सुचित यास संधी मिळू शकते. गोलंदाजीच्या आघाडीवर भुवनेश्वर कुमार, मार्को येनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन आहेत.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य टीम –

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया/खलील अहमद.

सनराइजर्स हैदराबाद संभाव्य टीम –

अभिषेक शर्मा, केन विलियमसन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को येनसेन, उमरान मलिक, टी नटराजन

Story img Loader