Chennai beat Gujarat by 15 runs: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघात २३ मे रोजी आयपीएल २०२३ मधील पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर अंतिम फेरीत १०व्यांदा धडक मारली आहे. या सामन्यात चेन्नई गुजरातला १७३ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु गुजरातला १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. यानंतर सीएसकेचा गोलंदाज दीपक चहरने आपल्या विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने क्वालिफायरमध्ये गुजरात विरुद्ध आपल्या संघाच्या विजयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, उपांत्य फेरीच्या सामन्यात १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी सोपे नसते. या सामन्यात दीपक चहरने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २९ धावांत २ बळी घेतले. या मोसमात जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुबमन गिलची त्याने मोठी विकेट घेतली. गिल क्रीजवर राहिला असता तर त्याने गुजरातला विजय मिळवून दिला असता.

लक्ष्याचा पाठलाग करणे गुजरात टायटन्ससाठी कठीण होते –

दीपक चहरच्या मते, गुजरात टायटन्ससाठी हे लक्ष्य इतके सोपे नव्हते आणि संपूर्ण प्रेक्षक सीएसकेला पाठिंबा देत होते. सामन्यानंतर तो म्हणाला, “सर्व काही ठीक चालले आहे आणि आता फक्त एक सामना बाकी आहे. आम्ही गुजरातच्या गोलंदाजांना पाहिले, तेव्हा चेंडूल स्टिक होत होता. त्यामुळेच आम्ही फुल्ल लेंथ चेंडू टाकण्याचा प्लॅन बनवला आणि जास्त प्रयोग केले नाहीत. जेव्हा तुम्ही उपांत्य फेरीच्या सामन्यात १७० धावांचा पाठलाग करत असाल आणि प्रेक्षकही तुमच्या विरोधात असेल, तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊन बसते.”

हेही वाचा – VIDEO: आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने ख्रिस गेलला अश्रू अनावर, इन्स्टावर शेअर केली भावनिक पोस्ट

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा पराभव करून चेन्नईvs विक्रमी १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ केवळ १५७ धावा करू शकला आणि सीएसकेने १५ धावांनी सामना जिंकला. आता चेन्नईचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak chahar saying chasing 170 runs when the crowd is against you it becomes difficult to chase the target vbm