Deepak Chahar bought by Mumbai Indians for IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी दीपक चहरवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. दीपक चहरला संघात सामील करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, शेवटी बाजी मारण्यात मुंबईला यश आले. मुंबईने 9.25 कोटी रुपये खर्च करून दीपकला आपल्या ताफ्यात सामील केले. चेन्नई सुपर किंग्सने दीपकच्या नावावर फक्त एकदाच बोली लावली आणि त्यानंतर संघाने आपले हात मागे घेतले.
सीएसकेच्या स्टारची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री –
दीपक चहर, जो चेन्नई सुपर किंग्जसाठी मागील काही हंगामात पावरप्लेमध्ये धमाका करत होता, आता तो आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पाच वेळच्या चॅम्पियन संघाने 9.25 कोटी रुपयांची बोली लावून मेगा लिलावात दीपकला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
दीपक बराच काळ सीएसके संघाचा भाग होता. त्यामुळे असा विश्वास होता की संघ लिलावात त्याच्या नावावर मोठी बोली लावू शकेल. मात्र तसे होऊ शकले नाही. उलट दीपक किंग्जसाठी पंजाबने मुंबईशी झुंज दिली. पंजाबने 8 कोटींची बोली लावल्यानंतर हात मागे घेतले. चेन्नई सुपर किंग्जने दीपकच्या नावावर फक्त एकच बोली लावली, पण मुंबईने 9.25 कोटींची बोली लावून दीपकला आपल्या संघात सामील केले.
हेही वाचा – Bhuvneshwar Kumar : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी
दीपक 2018 पासून सीएसकेचा होता भाग –
दीपक चहर दीर्घकाळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. 2018 मध्ये, सीएसकेने त्याला त्यांच्या संघात सामील केले होते. तेव्हापासून दीपक सीएसकेचा प्रमुख गोलंदाज होता. चेन्नईपूर्वी दीपक 2011, 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सचाही भाग होता. यानंतर, तो 2016 आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. दीपकने आयपीएल 2024 मध्ये एकूण 8 सामने खेळले आणि त्यादरम्यान त्याने एकूण 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी, दीपकने या लीगमध्ये खेळल्या गेलेल्या एकूण 81 सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत. आता दीपक जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसोबत मुंबई संघात दिसणार आहे.