यंदाचे आयपीएस हे एमएस धोनीचं शेवटचं आयपीएल असेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटविश्वात सुरू आहे. अशातच धोनीच्या निवृत्तीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत एक सूचक विधान केलं आहे. २०२३ नंतरही धोनी आयपीएल खेळू शकतो, असं तो म्हणाला. न्यूज इंडिया स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – Virender Sehwag: ‘…म्हणून सचिनने मला लाइव्ह सामन्यात बॅटने मारले’, वीरेंद्र सेहवागने केला खुलासा
धोनीने निवृत्ती घ्यावी, अशी सध्याची परिस्थिती नाही. त्याने शक्य तितके दिवस खेळावं अशी आमची इच्छा आहे. मुळात धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल, असं कोणीही सांगितलेलं नाही. तो पुढच्या वर्षीही आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो, अशी प्रतिक्रिया दीपक चहरने दिली. पुढे बोलताना तो म्हणाला, खरं तर कोणता निर्णय कधी घ्यायचा, हे धोनीला चांगलं माहिती आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा याबाबत कोणालाही माहिती नव्हते, हे आपण बघितलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणं हा आमच्यासाठी बहुमान आहे.
हेही वाचा – IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू CSK टीममधून बाहेर
दरम्यान, ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी आयपीएल स्पर्धेसाठी धोनीकडून जोरदार तयारी सुरू आहे. यंदा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.