वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, माहेला जयवर्धने, मॉर्ने मॉर्केल असे मातब्बर खेळाडू असूनही दिल्ली डेअरडेव्हिल्सला सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले आहे. बाद फेरीत जाण्याच्या आशा मावळत असताना दिल्लीसमोर रविवारी आव्हान ते बलाढय़ मुंबई इंडियन्सचे.
सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉण्टिंग ही अनुभवी जोडी फॉर्मसाठी झगडत आहे मात्र दिनेश कार्तिक, कीरॉन पोलार्ड, तुफानी फॉर्ममध्ये असल्याने मुंबईला चिंता नाही. रोहित शर्माकडून सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा आहे. मिचेल जॉन्सन, लसिथ मलिंगा, हरभजन आणि प्रग्यान ओझा ही चौकडी दिल्लीसाठी डोकेदुखी ठरू शकते.
दुसरीकडे दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या सेहवागकडून दिल्लीला मोठय़ा खेळीची आवश्यकता आहे. वॉर्नरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे. जयवर्धने, जुनेजा यांच्याकडून दिल्लीला नियमित चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. केदार जाधव हा दिल्लीसाठी आशेचा किरण आहे. गोलंदाजीत शाहबाझ नदीम आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त आहे, मात्र मॉर्ने मॉर्केल आणि इरफान पठाण या अनुभवी खेळाडूंकडून दिल्लीला जबाबदारीपूर्ण खेळाची अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ : दु. ४ वाजता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा