आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ६९ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात मुंबईचा पाच गडी राखून विजय झाला. तर पराभव झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान संपुष्टात आले. दिल्लीच्या पराभवाला संघाचा कर्णधारच कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. टीम डेव्हिडला बाद करण्याची चांगली संधी चालून आलेली असतानाही योग्य वेळी डीआरएस न घेतल्यामुळे दिल्लीचा पराभव झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> सामना मुंबई-दिल्लीचा, पण बंगळुरुला लाभ; ‘पलटण’च्या विजयामुळे विराटचा संघ थेट प्लेऑफमध्ये

नेमकं काय घडलं होतं?

दिल्ली संघाकडे टीम डेव्हिडला बाद करण्याची संधी चालून आली होती. मात्र ऋषभ पंतने ऐन वेळी डीआरएस घेतला नाही. शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू टीम डेव्हिडीच्या बॅटची किनार घेत ऋषभ पंतच्या हातात विसावला होता. मात्र खात्री नसल्यामुळे ऋषभ पंत तसेच शार्दुल ठाकुर दोघे गोंधळले. त्यानंतर चेंडू बॅटला लागला नसल्याचे समजत ऋषभने डीआरएस घेतला नाही.

हेही वाचा >> प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुच्या खेळाडूंनी हे काय केलं? MI vs DC सामन्यात मुंबईच्या विजयासाठी…

मात्र रिव्ह्यूमध्ये बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाल्याचे दिसले. या ठिकाणी पंतने डीआरएस घेतला असता तर टीम डेव्हिड बाद झाला असता. एकदा जीवदान मिळाल्यानंतर मात्र टीम डेव्हिड दिल्ली संघासाठी चांगलाच महागात पडला. त्याने अवघ्या ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजय सोपा झाला.

हेही वाचा >> पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

शेवटी या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर पाच गडी राखून विजय झाला. तर या पराभवासह दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi capitals captain rishabh pant avoided to take review for tim david wicket causes defeat prd