Delhi Capitals embarrassing record in IPL: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १६व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससोबत काहीही चांगले घडत नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाने आयपीएल २०२३ मध्ये सलग चार सामने गमावले आहेत. दिल्लीची फलंदाजी खूपच खराब झाली आहे, कारण प्रत्येक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या किमान ८ विकेट पडल्या आहेत. अगदी दिल्लीचा संपूर्ण संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध ऑलआऊट झाला आणि अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्सने एक लाजिरवाणा विक्रम आणखी मजबूत केला.

खरं तर, दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट झालेला संघ आहे. दिल्लीचा संघ २५व्यांदा आयपीएल सामन्यात ऑलआऊट झाला आहे. आधीच संघ अव्वल होता आणि आता पुन्हा एकदा ऑलआऊट झाल्यामुळे संघाचा हा लाजिरवाणा विक्रम आणखी भक्कम झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो २३ वेळा ऑलआऊट झाला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ वेळा ऑलआऊट झालेली राजस्थान रॉयल्स या प्रकरणात तिसऱ्या स्थानावर आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

या यादीत चौथे नाव पंजाब किंग्जचे आहे, ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात २० वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स देखील १९ वेळा ऑल आऊट झाला आहे. मुंबई इंडियन्सने देखील १८ वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंत १० वेळा ऑलआऊट झाला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्ज हा एकमेव संघ आहे, ज्याने ४ विजेतेपद जिंकले आहेत आणि १४ हंगामात केवळ ९ वेळा ऑलआऊट झाला आहे, यावरून चेन्नईची फलंदाजी किती खोली आहे हे दिसून येते. हेच संघाच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य आहे.

हेही वाचा – IPL 2023: रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला मोठा विक्रम; ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑलआऊट झालेले संघ –

२५ वेळा – दिल्ली कॅपिटल्स
२३ वेळा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२१ वेळा – राजस्थान रॉयल्स
२० वेळा – पंजाब किंग्ज<br>१९ वेळा – कोलकाता नाईट रायडर्स
१८ वेळा – मुंबई इंडियन्स
१० वेळा – सनरायझर्स हैदराबाद
९ वेळा – चेन्नई सुपर किंग्ज

Story img Loader