IPL 2025 Delhi Capitals Full Squad and Schedule: आयपीएल २०२५च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघानेही एक मजबूत संघ निर्माण केला आहे. यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर असेल. तर संघाचा उपकर्णधार फाफ डू प्लेसिस असणार आहे. लिलावापूर्वी संघाने ऋषभ पंतला रिलीज करत कुलदीप यादव, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक परेल यांना रिटेन केलं होतं. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सचा संघ नेमका कसा असणार आहे. यावर नजर टाकूया.

आता लिलावानंतर दिल्लीच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण आहे. संघाने फाफ डू प्लेसिस, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श यांसारख्या दिग्गज खेळाडूंना लिलावात खरेदी केलेंआहे आणि अनेक नवीन चेहऱ्यांवर मोठी बोली लावली. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण ७२.८० कोटी रुपये खर्च केले. दिल्ली संघाने केएल राहुल, मिचेल मार्श आणि टी नटराजन यांच्यावर सर्वाधिक पैसा खर्च केला. दरम्यान रिपोर्ट्सनुसार केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अक्षर पटेलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारली आणि सांगितले की एक खेळाडू म्हणून संघासाठी जास्तीत जास्त योगदान देऊ इच्छितो. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांची बोली लावून केएल राहुलला संघात सामील केले. राहुलला यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याने पंजाब किंग्स आणि नंतर दोन वर्ष लखनौ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते.

दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले खेळाडू

अक्षर पटेल – १६.५० कोटी
कुलदीप यादव – १३.२५ कोटी
अभिषेक पोरेल – ४ कोटी
ट्रिस्टन स्टब्स – १० कोटी

दिल्ली कॅपिटल्स संघाने तब्बल १४ कोटी रुपये मोजून केएल राहुलला ताफ्यात सहभागी केलं. राहुल यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स संघांकडे होता. लखनौ संघमालक आणि राहुल यांच्यात बेबनाव झाला होता. यष्टीरक्षण, सलामीवीर अशा भूमिका राहुल हाताळू शकतो. हॅरी ब्रूक आणि जेक फ्रेझर मॅकगर्क ही धडाकेबाज जोडी संघात होती. पण हॅरी ब्रुकने माघार घेतल्याने आता त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. तर गोलंदाजी विभागात अनुभवी मिचेल स्टार्कच्या जोडीला टी.नटराजन, मोहित शर्मा ही मंडळी दाखल झाली आहेत.

दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२५ संघ (Delhi Capitals IPL 2025 Full Squad)

करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव</p>

दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Delhi Capitals Match Schedule)

२४ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. लखनौ सुपर जायंट्स
३० मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद
५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
१० एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स
१३ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स
१६ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
१९ एप्रिल – गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२२ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२७ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२९ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
५ मे – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स
८ मे – पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
११ मे – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स

१५ मे – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स

Story img Loader