आयपीएलचे पंधरावे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी संघांची चुरस लागली आहे. अशा स्थितीत दोन सामने शिल्लक असताना आता दिल्ली संघासाठी एक चांगली बाब घडली आहे. कारण दिल्लीचा दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो दिल्ली संघाच्या हॉटेलमध्ये परतला आहे.
हेही वाचा >>> ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम, अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
मागील काही दिवसांपासून पृथ्वी शॉला विषमज्वरचा (टायफॉईड) त्रास जाणवत होता. अंगात ताप भरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असल्यामुळे तो तीन सामन्यात भाग घेऊ शखला नव्हता. मात्र आता तो विषमज्वरमधून बरा झाला असून त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. तशी माहिती दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने दिली आहे.
हेही वाचा >>> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती
“दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाच्या हॉटलमध्ये परतला आहे. आमच्या फ्रेंचायझीच्या डॉक्टरांची टीम त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे,” असे दिल्ली कॅपिटल्स संघाने सांगितले आहे.
हेही वाचा >>> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता
दरम्यान, पृथ्वी शॉ हा दिल्ली संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरलेला आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यात २५९ धावा केल्या आहेत. सध्या दिल्ली संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या संघाचे आणखी दोन सामने बाकी आहेत. उद्या म्हणजेच १६ मे रोजी दिल्लीचा सामना असेल. दोन्ही सामने जिंकल्यानंतर दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहू शकतो. त्यामुळे पृथ्वी शॉच्या येण्यामुळे संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र त्याला आजारातून बरे होण्यास आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे तो आगामी सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.