आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात दिल्ली आणि कोलकाता यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये संघर्षपूर्ण लढत झाली असून दिल्लीचा चार विकेट्सने विजय झाला आहे. कोलकाता संघाने दिल्लीसमोर विजयासाठी १४७ धावांचे आव्हान उभे केले होते. ही धावसंख्या गाठताना दिल्लीला कसरत करावी लागली. मात्र शेवटी रोवमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी संयमाने फलंदाजी केल्यामुळे दिल्लीला विजयापर्यंत मजल मारता आली.

कोलकाताने दिलेल्या १४७ धावांचे लक्ष्य गाठताना दिल्लीची सुरुवातीला कसरत झाली. नंतर मात्र रोवमन पॉवेल आणि अक्षर पटेल या जोडीने संघाला सावरत विजयापर्यंत नेलं. सलामीला आलेला पृथ्वी शॉ खातं न खोलताच तंबुत परतला. तर डेविड वॉर्नरने २६ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. त्यानंतर ८२ ते ८४ पर्यंतची धावसंख्या गाठताना दिल्लीचे तीन फलंदाज बाद झाले.

हेही वाचा >> दिल्लीला चिअर करण्यासाठी आली ऋषभ पंतची गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल

दिल्ली संघ ८२ धावांवर असताना डेविड वॉर्नर (४२) आणि ललीत यादव (२२) असे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिल्लीच्या ८४ धावा झालेल्या असताना ऋषभ पंतदेखील (२) उमेश यादवच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र दिल्लीवर दबाव निर्माण झाला होता. मात्र रोवमन पॉवेल (३३, नाबाद) आणि अक्षर पटेल (२४) या जोडीने संयमी खेळ दाखवत दिल्लीला विजयापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. शार्दुल ठाकुरने १४ चेंडूंमध्ये आठ धाव केल्या.

हेही वाचा >> पहिला सामना, पहिलं षटक! चेतन सकारियाने आरॉन फिंचला केलं त्रिफळाचित

याआधी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजासाठी आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेले आरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर स्वस्तात बाद झाले. फिंचने तीन तर व्यंकटेशने सहा धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने आपली भूमिका चोख बजावत ३७ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी आलेले इंद्रजित आणि सुनिल नरेन मैदानावर जास्त काळासाठी तग धरू शकले नाहीत. दोघांनीही अनुक्रमे आठ आणि एक धाव केली.

हेही वाचा >> Video : गुजरात-हैदराबाद सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरनला राग अनावर, डगआऊटमध्ये…

कोलकाताची ३५ धावांवर चार गडी बाद अशी स्थिती झालेली असताना नितीश राणाने संघाला सांभाळले. त्याने अर्धशतकी खेळी करत ३४ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. तर रिंगू सिंगने २३ धावा करत कोलकाताचा धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न केला. आंद्रे रसेल (०), टीम साऊदी (०) खातंदेखील खोलू शकले नाहीत. वीस षटके संपेपर्यंत कोलकाता १४६ धावा करु शकला.

हेही वाचा >> धोनीपासून ते राहुल तेवतियापर्यंत, जाणून घ्या IPL 2022 मधील असे पाच खेळाडू, ज्यांची फलंदाजी कायम स्मरणात राहील

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत कोलकाताच्या फलंदाजांना रोखून धरलं. फिरकीपटू कुलदीप यादवने गोलंदाजीमध्ये कमाल करुन दाखवली. त्याने श्रेयस अय्यर, इंद्रजित, आंद्रे रसेल, सुनिल नरेन अशा दिग्गज फलंदाजांना तंबुत पठवलं. त्याने एकूण चार विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रहमान यानेदेखील तीन विकेट्स घेत केकेआर संघ खिळखिळा केला.

हेही वाचा >>२०१६ साली होता किंग आता धावांसाठी झगडतोय, जाणून घ्या विराट कोहलीचा IPLमधील इतिहास

तर कोलकाताचे गोलंदाजही दिल्लीवर भारी पडले. दिल्लीला जिंकण्यासाठी अवघ्या १४७ धावांजी गरज असताना कोलकाताच्या गोलदाजांनी चोख काम केले. परिणामी सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला होता. उमेश यादवने तीन बळी घेतले. तर हर्षित राणा, सुनिल नरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader