कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील लढत अटीतटीची ठरली. या सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात काहीशी खराब झाली. तर सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा कोलकाताचा निर्णय उमेश यादवे योग्य ठरवला. त्याने देवदत्त पडिक्कला झेलबाद करत राजस्थानच्या फलंदाजांवरील दबाव वाढवला. परिणामी वीस षटकात राजस्थानला फक्त १५२ धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा >> ‘मोहसीनची गोलंदाजी पाहून मोहम्मद शमी झाला होता खूश, म्हणाला माझ्यापेक्षा..,’ प्रशिक्षकाने सांगितली आठवण

सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने सावध पवित्रा घेतला होता. मात्र ही योजना कोलकाताच्या उमेश यादवने यशस्वी होऊ दिली नाही. उमेश यादवने सलामीला आलेल्या देवदत्त पडिक्कलला बाद करण्यात यश मिळवले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पडिक्कल झेलबाद झाला. उमेशने टाकलेलेल्या चेंडूचा सामना करताना देवदत्त गोंधळला. देवदत्तने बचावात्मक पवित्रा घेत चेंडू फक्त टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू तयारीत असलेल्या उमेश यादवच्या थेट हातात गेला. परिणामी पडिक्कलला अवघ्या २ धावांवर तंबुत परतावं लागलं.

हेही वाचा >> सनरायझर्स हैदराबाद संकटात, वॉशिंग्टन सुंदर पुन्हा जखमी

दरम्यान, सलामीला आलेला देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ४९ चेंडूंमध्ये ५४ धावा करत अर्धशतक नोंदवले. तर करुण नायर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर यांनीदेखील राजस्थानचा धावफलक १५२ पर्यंत घेऊन जाण्यासाठी समाधानकारक फलंदाजी केली.

Story img Loader