आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ व्या सामन्यात वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सामना सुरु असताना वीज नसल्यामुळे चेन्नई संघाला मोठा फटका बसला. पंचाने चुकीचा निर्णय देऊनही मैदानात वीज नसल्यामुळे चेन्नईला डीआरएस घेता आला नाही. परिणामी चेन्नईच्या ड्वेन कॉन्वेला पहिल्याच षटकात तंबुत परतावे लागले.

हेही वाचा >> इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती

सामना सुरु असताना नेमके काय झाले ?

मुंबई आणि चेन्नई यांच्यात सामना सुरु असताना पहिल्याच षटकादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. याचा चेन्नईला चांगलाच फटका बसला. पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर चेन्नईकडून सलामीला आलेल्या ड्वेन कॉन्वेला चुकीच्या पद्धतीने पायचित म्हणून बाद देण्यात आले. चेंडू स्टंपच्या बाजूने गेलेला असूनदेखील त्याला पंचांनी बाद दिले. त्यावर उपाय म्हणून ड्वेन कॉन्वेने डीआरएस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानात वीज उपलब्ध नसल्यामुळे त्याला डीआरएस घेता आला नाही. परिणामी बाद नसूनदेखील कॉन्वेला खातं न खोलताच तंबुत परतावं लागलं.

हेही वाचा >> ‘BCCI ला भाजपा सरकार चालवतंय, खेळायचं असेल तर पाकिस्तानात या’, पीसीबीच्या माजी अध्यक्षांचं मोठं विधान

कॉन्वे बाद झाल्यानंतर चेन्नईची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले. अर्धा संघ बाद झालेला असताना चेन्नईच्या अवघ्या २९ धावा झाल्या होत्या. शेवटी चेन्नई संघ फक्त १६ षटकांमध्ये ९७ धावा करु शकला.

हेही वाचा >> शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ

दरम्यान, मुंबईसारख्या ठिकाणी आयपीएल सुरु असताना मैदानात वीज उपलबद्ध नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर चेन्नईच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

Story img Loader