हाताला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि पुणे वॉरियर्सच्या पहिल्या सामन्याला शिखर धवन मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पदार्पणाच्या सामन्यातच वेगवान शतक ठोकल्यामुळे धवन अलीकडे चर्चेत आलाय. मात्र, याच मालिकेमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे तो सनरायजर्स हैदराबादच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झालंय.
धवनची दुखापतीमध्ये सुधारणा होत असली, तरी तो सनरायजर्स हैदराबादचा पाच एप्रिलला होणारा पहिला सामना खेळू शकणार नाही. तो खेळण्यासाठी नक्की कधी उपलब्ध होईल, याची माहिती आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून घेत आहोत. असे संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले. येत्या दोन आठवड्यात धवन नक्कीच खेळण्यासाठी मैदानात उतरले, अशी अपेक्षा मूडी यांनी व्यक्त केलीये. दुखापतीमुळे धवन पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला पुढील काही सामन्यांनाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा