MS Dhoni Dugout Reaction after Golden Duck: सोमवारी (दि. २९ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा मान चेन्नई सुपर किंग्स संघाला मिळाला. अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत अष्टपैलू रवींद्र जडेजा याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्याचा निकाल येण्यासाठी २० तासांपेक्षा जास्त कालावधी लागला, पण शेवटी महेंद्र सिंग धोनी याच्या संघानेच बाजी मारली. चेन्नईने गुजरातला डकवर्थ-लुईस नियमानुसार ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. मात्र, त्याआधी मोहित शर्माच्या गोलंदाजीवर धोनी बाद झाल्यानंतर त्याची डगआउटमधील रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.

अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा निराशा केली. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट झालेल्या अंतिम सामन्यात धोनीचे लाखो चाहते आणि खुद्द माही देखील निराश झाला. कर्णधार एम.एस. धोनी फलंदाजीला येताच जवळपास १.२५ लाख क्रिकेट चाहते उत्साही दिसले, त्यांनी धोनी-धोनी नावाचा घोषणा द्यायला सुरुवात केली पण पहिल्याच चेंडूवर तो बाद होताच संपूर्ण मैदानात शांतता पसरली. क्रिकेटच्या भाषेत याला गोल्डन डक म्हणतात.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

अंतिम सामन्याच्या १३व्या षटकात मोहित शर्माने धोनीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. धोनीने ताशी १३५.३ किलोमीटर वेगाने फेकलेला चेंडू थेट डेव्हिड मिलरच्या हातात गेला. आऊट झाल्यानंतर धोनीही शॉकमध्ये होता… फार कमी वेळ तो आऊट झाल्यावर रिअ‍ॅक्ट करतो…डकआऊटमध्ये बसला तेव्हाही डोकं हलवत होता. कारण, तो बाद झाल्यानंतर सामना दोलायमान स्थितीत गेला आणि त्यावेळी धोनी तिथे असण जास्त महत्वाच होतं. यावेळी त्याच्या मनात वेगवेगळ्या विचारांचे काहूर उठले होते. तो काही क्षणासाठी भावूक झाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हस्तक्षेप करून अडीच तासांचा खेळ वाया घालवला. सामना १२.१० वाजता पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याचे शतक हुकले आणि तो ४७ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून बाद झाला. यानंतर चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या.

हेही वाचा: CSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो! एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव

विशेष म्हणजे आयपीएल २०२३ची सुरुवात गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याने झाली. या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामनाही खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्यांनी प्रथम पात्रता फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत गुजरातचा पराभव केला. आयपीएल २०२३ मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संस्मरणीय विजय मिळवून दिला.