Dhurv Jurel Family Video After Maiden IPL Half Century : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर सात गडी राखून शानदार विजय मिळवत आयपीएल २०२४ मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. या सामन्यात युवा फलंदाज ध्रुव जुरेलने राजस्थानसाठी ५२ धावांची निर्णायक नाबाद खेळी खेळून सर्वांची मने जिंकली. फक्त संघासाठी आणि ध्रुवसाठी नाही तर त्याच्या कुटुंबासाठीही हा खूप मोठा क्षण होता. ध्रुवच्या या मॅचविनिंग खेळीनंतर सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला भेटण्यासाठी मैदानावर आले होतेस ज्याचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

ध्रुव जुरेलने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि ३४ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनसोबत त्याने १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली ज्यामुळे राजस्थान रॉयल्सला एक षटक शिल्लक राहून विजय मिळवता आला. ध्रुव जुरेलने या सामन्यात शानदार फटकेबाजी केलीच पण त्याची शॉटची निवड आणि सामन्याचा रोख समजून घेत फलंदाजी केली. ध्रुवने या सामन्यात अर्धशतक झळकावताच पुन्हा एकदा सॅल्युट करत सेलिब्रेशन केले. पण खास गोष्ट म्हणजे त्याचे वडीलही या सामन्यासाठी उपस्थित होते.

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

सॅल्युट बॉय ध्रुव जुरेलचं वडिलांसोबत पहिल्या अर्धशतकाचे सेलिब्रेशन

एलएसजी विरुद्ध आरआर सामन्यानंतर, आयपीएलच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला जो व्हायरल झाला. यामध्ये, ध्रुव जुरेल त्याच्या पहिल्या आयपीएल अर्धशतकानंतर मैदानामध्ये त्याच्या कुटुंबासह विजय साजरा करत आहे. त्याच्या आई-वडिलांसहित त्याचे संपूर्ण कुटुंब मैदानात हजर होते. ध्रुवने यासोबतच इन्स्टाग्रामवर सॅल्युट करतानाचा फोटो शेअर करत बाबा हे तुमच्यासाठी आहे, असे कॅप्शन त्याला दिले.

ध्रुवने अर्धशतकानंतर सॅल्युट देत सेलिब्रेशन केले होते, त्याला या सेलिब्रेशनबद्दल विचारताच त्याने सामन्यानंतर सांगितले. “मी नेहमीच माझ्या वडिलांसाठी खेळतो, मी कसोटी सामन्यातही अर्धशतकानंतर असंच सेलिब्रेशन केले होते. बाबा सैन्यदलeत होता, ते आज सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आणि हे सॅल्युट सेलिब्रेशन त्यांच्यासाठीच होते.”

ध्रुवने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यातही संघाला गरज असताना शानदार खेळी केली होती. या खेळीत त्याने अर्धशतक पूर्ण करताच सॅल्युट देत त्याचे सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या खेळीच्या आदल्या दिवशी त्याच्या वडिलांशी तो कॉलवर बोलत असताना ते म्हणाले, एक सॅल्युट तर दाखव, म्हणजेच त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा होता की मोठी खेळी करून दाखव आणि ध्रुवने पुढील खेळीत त्याच्या वडिलांचे शब्द खरे ठरवत सॅल्युट देत अर्धशतकाचे सेलिब्रेशन केले होते.

Story img Loader