Dinesh Karthik Shares Photo With Virat: आयपीएल २०२३ चा ६५ वा सामना (१८ मे) रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना हैदराबादचे घरचे मैदान असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने विराट कोहलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक विराटच्या फोनमध्ये बघताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीच्या पुढील सामन्यापूर्वी संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो आणि विराट एकत्र दिसत आहेत. त्यासोबतच त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चीझी कॉमेंट्स पाहत आहोत’. या फोटोंमध्ये विराट कोहली आणि दिनेश कार्तिक खूपच मस्त दिसत आहेत. पहिल्या फोटोत कार्तिक आणि विराट फोनवर गंभीरतेने कमेंट वाचताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत दोघेही रिअॅक्शन देताना दिसत आहेत. कार्तिकने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्तिक आणि विराटचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे. आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आयपीएलच्या साखळी टप्प्यात आरसीबीला अजून दोन सामने खेळायचे आहेत. पहिला सामना गुरुवार हैदराबादशी होणार आहे. त्याच वेळी, संघाचा पुढील सामना २१ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. आयपीएलच्या चालू हंगामातील प्लेऑफमध्ये पात्र ठरणारा गुजरात हा पहिला संघ आहे.

हेही वाचा – Ashes Series 2023: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का! जोफ्रा आर्चर पाठोपाठ ‘या’ खेळाडूलाही झाली दुखापत

दुसरीकडे, आरसीबी संघाबद्दल बोलायचे, तर या संघाचा मागील सामन्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. कारण मागील सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी पराभव केला होता. या विजयाच्या जोरावर आरसीबी संघाने अनेक विक्रमांना गवसनी घातली. त्याचबरोबर या विजयाच्या जोरावर आपल्या नेट रन रेटमध्येही सुधारण केली. आरसीबी संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामने गमावले आणि सहा सामने जिंकले आहे. त्यामुळे संघ आता १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthik has shared photos on instagram of virat kohli reading comments on social media vbm