आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २४ वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन तगड्या संघांमध्ये खेळवला गेला. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे ही लाढत चांगलीच अटीतटीची ठरली. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने स्टंप्सवर चेंडू डायरेक्ट हीट करत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला धाबवाद केलं. विशेष म्हणजे हार्दिकने फेकलेला चेंडू अतिशय वेगात असल्यामुळे स्टंप थेट तुटला. हार्दिकच्या डायरेक्ट हीटने स्टंप तुटल्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.
हेही वाचा >> IPL 2022, RRvsGT : रासी ड्यूसेनचा डायरेक्ट हीट! मॅथ्यू वेडला केलं बघता बघता धावबाद
राजस्थानने दिलेले १९२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी सलामीला जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल आले. मात्र दुसऱ्याच षटकात देवदत्त पडिक्कलचा त्रिफला उडाल्यामुळे तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानच्या ५६ धावा असताना रविचंद्रन अश्विन झेलबाद झाला. तसेच अर्धशतकी खेळी करुन जोस बटलरदेखील ५४ धांवावर त्रिफळाचित झाला. राजस्थानचे गडी ठराविक अंतरावर बाद होत गेले. दरम्यान, हार्दिक पांड्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला थरारक पद्धतीने धावबाद केले.
हेही वाचा >> ‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?
राजस्थानच्या ७४ धावा झालेल्या असताना संजू सॅमसनने लोकी फर्ग्यूसनने टाकलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक पांड्याने चपळाई दाखवत सॅमसन क्रीजमध्ये पोहोचायच्या आत चेंडू स्टंप्सवर डायरेक्ट हीट केला. चेंडू थेट स्टंप्सवर लागल्यामुळे स्टंप तुटला. ज्यामुळे सामना साधारण पाच ते दहा मिनिटे थांबवावा लागला. नवा स्टंप लावल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला.
हेही वाचा >> IPL 2022 : ‘बेबी एबी’ची तुफानी फलंदाजी पाहून रोहित शर्मा झाला प्रभावित, मैदानावर येऊन…
दरम्यान, गुजरात टायटन्सने राजस्थानसमोर १९२ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार हार्दिक पांड्याने ८७ धावांची नाबाद खेळी केल्यामुळे गुजरातला ही धावसंख्या गाठणे शक्य झाले.