Shreyas Iyer wary of mistakes breaks silence on BCCI snub Ranji controversy : भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडला आहे. क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीसह पुनरागमन केले आणि आता त्याची नजर आयपीएलवर आहे. जिथे तो कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. संघाचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल आणि केंद्रीय कराराबद्दल प्रतिक्रिया दिली.
डॉक्टर काय म्हणतात याचा श्रेयस अय्यर विचार करत नाही –
श्रेयस अय्यरने पाठीचा त्रास असूनही मुंबईसाठी रणजी फायनलमध्ये ९५ धावांची खेळी खेळली. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला एका अटीवर आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे की त्याने काळजी घ्यावी. केकेआरच्या कर्णधाराला मात्र तो सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे वाटत आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाच्या सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला श्रेयस अय्यर म्हणाला, “मला दुखापतीबद्दल विचार करायचा नाही की डॉक्टरांनी काय सांगितले. दुखापत काय होती. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे. जेव्हा तुम्ही खूप विचार करता तेव्हा दुखापतीवर लक्ष केंद्रित राहते आणि अशा स्थितीत तुम्ही काय उत्कृष्ट करत होता हे विसरता. त्यामुळे मला सर्व काही विसरून फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
हेही वाचा – Abhishek Porel : कोण आहे अभिषेक पोरेल? ज्याने पंजाबविरुद्ध शेवटच्या षटकात पाडला षटकार-चौकारांचा पाऊस
भूतकाळाचा विचार करणे ही चूक –
श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, “जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यावर जास्त लक्ष केंद्रित केले, तर मला वैयक्तिकरित्या वाटते की तुम्ही खूप चुका करता. त्यामुळे मी वेळेनुसार एक गोष्ट शिकली आहे, जे काही आहे ते तुमच्या हातात आहे. त्याचा उत्तम उपयोग करून घेतला पाहिजे. तसेच ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यावर जितके लक्ष द्याल तितका त्रास होईल.”
हेही वाचा – IPL 2024 : लिव्हिंस्टोनचा विजयी षटकार आणि पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय, सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार
कोलकाता नाईट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, मनीष पांडे, श्रीकर भारत, मुजीब उर रहमान, अनुकुल रॉय, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया, शेरफेन रदरफोर्ड, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, आंग्रिश रघुवंशी, साकिब हुसेन, सुयश शर्मा