Fine In IPl 2023 : आयपीएल २०२३ मध्ये एकाहून एक रंगदार सामने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, सामन्यात आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन होतानाही दिसत असल्याने कर्णधारांच्या खिशाला कात्री बसली जात आहे. आयपीएलमध्ये अटीतटीचे सामने होत असताना घाई गडबडीत घेतलेला निर्णय सामन्यात पराभवाचं कारण ठरू शकतो. अशातच कोणताच कर्णधार विचार विनिमय न करता निर्णय घेत नाही. म्हणून आयपीएलमध्ये कर्णधारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
वार्नरला १२ लाख तर कोहलीला २४ लाखांचा दंड
सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने हैद्राबादचा ७ धावांनी पराभव केला. परंतु, कर्णधार डेव्हिड वार्नरला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटिंगमुळं वार्नरवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसंच कोहलीही या समस्येपासून वाचला नाही. एक दिवस आधी झालेल्या सामन्यात कोहलीला २४ लाखांचा दंड भरावा लागला. कोहलीने दोनदा चूक केल्याने त्याला १२ लाखांचा अतिरिक्त दंड भरावा लागला.
आयपीएलचा नियम काय आहे?
सामना दिलेल्या निश्चित वेळेत संपला पाहिजे, असा आयपीएलचा नियम आहे. ३ तास २० मिनिटात कोणताही सामना संपला पाहिजे. एक इनिंग ८५ मिनिटांच्या आत म्हणजेच २० षटक पूर्ण झाले पाहिजेत. जर असं झालं नाही, तर कर्णधाराला सामन्यातील शुल्काचं १० टक्के दंड भरावा लागतो. जर दुसऱ्यांना अशी चूक झाली, तर हा दंड दुप्पट केला जातो.
आयपीएल २०२३ मध्ये कर्णधारांवर दंडात्मक कारवाई
कोहली आणि वार्नरच्या आधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, के एल राहुल, हार्दिक पांड्या, डु प्लेसिस, सूर्यकुमार यादवला १२-१२ लाखांचा दंड भरावा लागला आहे. क्रिकेटनुसार हा नियम योग्य आहे. पण कर्णधारांना या नियमांना गांभिर्याने घ्यावं लागणार आहे.