Ruturaj Gaikwad in CSK vs LSG Match: चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी खेळल्या गेलेल्या IPL २०२३च्या सामन्यात के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सचा १२ धावांनी पराभव करून या मोसमातील पहिला विजय नोंदवला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि ऑफस्पिन अष्टपैलू मोईन अलीचा मोठा वाटा आहे. ऋतुराज गायकवाडने ३१ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावांची स्फोटक खेळी खेळली.
ऋतुराज गायकवाडच्या षटकाराने लाखोच्या गाडीला पडला डेंट
आपल्या स्फोटक खेळीदरम्यान ऋतुराज गायकवाडने बुलेटच्या वेगाने षटकार मारला आणि त्याच्या सुरेख षटकाराने लाखोंच्या कारला मोठा खड्डा पडला. खरं तर, सामन्यादरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाडने लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज कृष्णप्पा गौतमला षटकार मारला जो थेट मैदानाबाहेर उभ्या असलेल्या टाटाच्या कारवर गेला. ऋतुराज गायकवाडचा सिक्स बुलेटच्या वेगाइतका होता, त्यामुळे टाटाच्या गाडीला डेंट पडला.
प्रायोजकांना दुहेरी फटका
आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा जेव्हा चेंडू Tiago EV वर आदळतो, तेव्हा टाटा कर्नाटकातील कॉफीच्या लागवडीची जैवविविधता वाढवण्यासाठी ५ लाख रुपये देईल असा नियम होता. नियमानुसार, चेंडू सरळ कारला लागला त्यामुळे ५ लाख रुपये गरिबांना दान केले जातील. त्यात गाडीचे नुकसान झाले ते वेगळे, अशा परिस्थितीत प्रायोजकांना दुहेरी फटका बसला आहे. याआधी ऋतुराजने गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९२ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा: IPL 2023: मला हसता येत नाही! धोनीचा षटकार पाहून गंभीरचा चेहरा पडला…, पाहा Video
चेन्नईने लखनऊला हरवले
सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३च्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या शतकी भागीदारीनंतर, चेन्नई सुपर किंग्जने मोईन अलीच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सात विकेट्स गमावत २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ २० षटकांत सात विकेट्स गमावून २०५ धावाच करू शकला. चेन्नईसाठी मोईन अलीने चार षटकांत २६ धावा देत चार बळी घेत लखनऊच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. तुषार देशपांडेनेही दोन गडी बाद केले. लखनऊसाठी काईल मायर्सने सलग दुसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना २२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या, तर निकोलस पूरनने अखेरच्या षटकात २८ चेंडूत ३२ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दमदार खेळ करता आला नाही. कर्णधार के.एल. राहुल २० धावा करून बाद झाला.