Faf Du Plessis Longest Six In IPl 2023 Video : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने धावांचा पाऊस पाडला. फाफने ४६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार ठोकून ७९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पण आख्ख्या स्टेडियममध्ये चर्चा रंगली ती फक्त फाफने मारलेल्या गगनचुंबी षटकाराची. लखनऊ सुपर जायंट्सचा लेग स्पिनर रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर फाफने जोरदार फटका मारत सर्वात लांब षटकार मारला. ११५ मीटर लांबीचा हा षटकार असल्याने चेंडू थेट स्टेडिमयबाहेर गेला. फाफने मारलेल्या या षटकाराची आयपीएलमधील सर्वात लांब षटकारांच्या इतिहासात नोंद झाली आहे. फाफने मारलेला हा षटकार आयपीएल २०२३ मधील सर्वात लांब षटकार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम एलबी मॉर्केलच्या नावावर आहे. २००८ मध्ये मॉर्केलने सीएसकेसाठी १२५ मीटर लांब षटकार ठोकला होता. दुसऱ्या नंबरवर प्रवीण कुमारच्या २०१३ मध्ये मारलेल्या १२४ मीटर लांबीच्या षटकाराची नोंद आहे. पंबाजच्या संघाकडून खेळताना प्रवीने हा षटकार मारला होता. २०११ मध्ये पंजाबकडून खेळताना गिलक्रिस्टने १२२ मीटर लांबीचा षटकार मारला होता. तर चौथ्या नंबरवर रॉबिन उथप्पाच्या १२० मीटर लांबीच्या षटकाराची नोंद आहे. तसंच २०१३ मध्ये आरसीबीसाठी ख्रिस गेलने ११९ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता.

नक्की वाचा – रिंकू सिंग आता टीम इंडियात खेळणार? मुलाखत देताना रिंकू म्हणाला, “भारतासाठी खेळणं…”

इथे पाहा व्हिडीओ

सहाव्या स्थानावर युवराज सिंगच्या ११९ मीटर लांबीच्या षटकाराची नोंद आहे. सातव्या स्थानावर रॉस टेलरचा ११९ मीटरचा षटकार, आठव्या स्थानावर बेन कटिंगच्या ११७ मीटरच्या षटकाराची नोंद आहे. २०१३ मध्ये गौतम गंभीरने कोलकातासाठी ११७ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता. तर २००९ मध्ये सीएसकेसाठी एम एस धोनीने ११५ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता. एम एस धोनी या लिस्टमध्ये दहाव्या स्थानावर आहे.