Faf du Plessis photo with stomach bandage goes viral: आयपीएल १६ मध्ये मंगळवारी (१७ एप्रिल) सीएसके आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा ८ धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी २०० धावांचा आकडा पार केला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोटावर पट्टी बांधलेला दिसत होता. यानंतरही त्याने संघासाठी शानदार खेळी खेळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणून फाफ डू प्लेसिसने बांधली होती पट्टी –

सामन्यात आरसीबी धावांचा पाठलाग करत होता. यादरम्यान संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पोटदुखीमुळे त्रस्त दिसला. कर्णधाराला वेदना होत असल्याचे पाहून संघाचे फिजिओ तात्काळ मैदानावर आले. त्यानंतर त्यांनी फाफच्या पोटावर पट्टी बांधली. डु प्लेसिसचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोट दुखत असूनही, फॅफने शानदार खेळी केली आणि धावांचा पाऊस पाडला. आरसीबीच्या कर्णधाराने ३३ चेंडूत १८७.८८ च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

सामन्यानंतर फाफ डु प्लेसिसने केला खुलासा –

फाफ डु प्लेसिसने सामन्यानंतर याचा खुलासा केला. तो म्हणाला, “क्षेत्ररक्षणादरम्यान माझ्या बरगडीला दुखापत झाली होती. म्हणूनच पट्टी लावली होती. आरसीबीचा कर्णधार संघाच्या फलंदाजीबद्दल म्हणाला, “माझ्या मते, आम्ही चांगली फलंदाजी केली, पण शेवटच्या चार षटकांमध्ये आम्ही सामना आमच्या बाजूने वळवू शकलो नाही. नाणेफेकीच्या वेळीच मी म्हणालो होतो की इथे २०० धावा होतात. सन्मानजनक धावसंख्येपेक्षा १०-१५ धावा जास्त झाल्या.”

हेही वाचा – IPL 2023 LSG vs CSK: लखनऊ आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात मोठा बदल; आता ४ मे ऐवजी ‘या’ दिवशी होणार सामना

सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून २१८ धावाच करू शकला. आरसीबीचा पुढील सामना २० एप्रिल रोजी मोहाली येथे पंजाब किंग्जशी होणार आहे. त्याच वेळी, सीएसके संघ २१ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faf du plessis washes csk bowlers even with a bandage on his stomach due to stomach pain photo viral vbm
Show comments