Cheerleaders dancing while their hands injured: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी ६२ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर होत आहे. हा फोटो कोणत्या खेळाडूचा नसून एका चीअरलीडरचा आहे.या फोटोमुळे चाहते सनरायझर्स हैदराबाद आणि बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका करता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलदरम्यान केवळ खेळाडूच नव्हे तर चीअर लीडर्सही खूप मेहनत घेतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जे पाहून चाहते चीअरलीडर्ससाठी दिलासा देत आहेत. तसेच बीसीसीआय आणि सनरायझर्स हैदराबादवर जोरदार टीका करत आहेत.

हाताला दुखापत असताना चिअरलीडरने केला डान्स –

सोमवारी गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. त्यांच्या डावातील तिसरे षटक सुरू होणार होते. याआधी कॅमेरा सनरायझर्स हैदराबादच्या चीअर लीडर्सकडे गेला. एक चीअरलीडर तिच्या हाताला दुखापत असताना पट्टी बांधून नाचताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. दुखापत किती गंभीर होती, हे माहित नाही, परंतु चाहत्यांनी या चीअर लीडरच्या धैर्याचे नक्कीच कौतुक केले.

चाहत्यांची बीसीसीआयवर टीका –

काही चाहत्यांनी यासाठी बीसीसीआयला जबाबदार धरले. दुखापत असूनही चीअर लीडवर डान्स करायला भाग पाडले जात असेल, तर ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे तो म्हणाला. या चीअरलीडर्सना सन्मान आणि विश्रांती मिळायला हवी. तसेच चाहते सनरायझर्स हैदराबादवरही टीका करताना दिसले. कारण या चिअरलीडर्स हैदराबाद संघाच्या होत्या.

हेही वाचा – ENG vs AUS: मुंबई इंडियन्स पाठोपाठ इंग्लंड संघाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून ‘हा’ खेळाडू बाहेर

सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना गिलच्या शतकाच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. त्यामुळे त्यांना ३४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.