Dhoni Gym Video Viral: एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके (CSK) ३१ मार्च रोजी आयपीएल २०२३ मधील त्यांच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चेन्नईचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचे खेळाडू आगामी हंगामापूर्वी घाम गाळत आहेत. धोनीही तयारीत व्यस्त आहे. धोनीचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये चेन्नईचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होते. आता धोनीच्या जिमचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो क्रेझची वेगळीच कहाणी सांगत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनीला व्यायाम करताना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी –

सीएसके फॅन क्लबने एमएस धोनीचा जिममध्ये घाम गाळत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी चेपॉकमधील जिममध्ये वॉर्म अप करताना दिसत आहे. धोनी व्यायामात मग्न आहे आणि तेव्हाच चाहते जिमबाहेर मोठ्या संख्येने येतात. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि जोरजोरात धोनी-धोनी ओरडू लागले. क्रेझचे हे दृश्य फक्त निवडक क्रिकेटपटूंसोबतच पाहायला मिळते.

सीएसके हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे –

चेन्नई हा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईने आतापर्यंत चार ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याच्यापुढे फक्त मुंबई इंडियन्स आहे, ज्याने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी पहिल्या सत्रापासून सीएसकेशी जोडला गेला आहे. आयपीएल २०२३ हा धोनीचा खेळाडू म्हणून शेवटचा सीझन असू शकतो, असे बोलले जात आहे. चेन्नईने गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली होती. सीएसके ने आयपीएल २०२२ मध्ये फक्त ४ सामने जिंकले होते. त्यामुळे ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर होते. धोनी ब्रिगेडचे आगामी हंगामात नव्याने सुरुवात करण्याकडे लक्ष आहे.

हेही वाचा – Team India: संजू सॅमसन आणि शिखर धवन भारतासाठी वनडे विश्वचषक खेळणार? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने वाढवली आशा

आयपीएल २०२३ साठी सीएसके संघ:

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंह, दीपिका, दीपिका, सिमार, , प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans flock to see ms dhoni working out in the gym ahead of ipl 2023 vbm