Greetings For Rohit Sharma On Twitter : आयपीएल २०२३ मध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून शनिवारी वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. मुंबईने २० षटकांत १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, प्रत्युत्तरात चेन्नईने मुंबईचा या सामन्यात ७ विकेट्स राखून पराभव केला. चेन्नई १८.१ षटकात १५९ धावा करून सामना खिशात घातला. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु, मुंबईचा पराभव होऊनही सोशल मीडियावर कर्णधार रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. रोहित शर्माला क्रिकेटमध्ये मिळालेलं यश महत्वाचं असल्याचं ट्वीटरद्वारे चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेझी एलिगन्स नावाच्या ट्वीटरल हॅंडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसंत रोहितला सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत, असाही उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माने ठसा उमटवला आहे, असंही म्हटलं आहे. त्यामुळे रोहित आमच्यासाठी नेहमीच महान खेळाडू असल्याचं चाहते म्हणत आहेत.

नक्की वाचा – गुवाहाटीत डेविड वार्नरने रचला इतिहास; RR विरोधात ‘विराट’ खेळी करून कोहलीचा मोडला विक्रम

तसंच एका ट्वीटर युजरने म्हटलं, मुंबईने पाचवेळा आयपीएलमध्ये जेतेपदावर शिक्कामोर्तब केला, त्यावेळी रोहितने मोठं विधान केलं होतं. खेळाडूंच्या सहकार्यामुळेच मुंबई इंडियन्सला यश मिळालं, असं रोहित म्हणाला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाली, यावर रोहित म्हणाला, मी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. आम्हाला आमच्या कर्णधाराचा अभिमान आहे, असं कॅप्शन या पोस्टमध्ये देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans praises mumbai indian skipper rohit sharma on twitter even after two consecutive defeat in ipl 2023 nss