Ishant Sharma’s no ball: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये नो बॉलवरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आठवडाभरात आणखी एक प्रकरण समोर आले असून त्यावर चाहत्यांनी पंचांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात इशांत शर्माच्या चेंडूला थर्ड अंपायरने नो बॉल म्हटले होते. त्यानंतर चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना आठवला.

इशांत शर्माच्या नो बॉलवर गोंधळ –

धरमशाला येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला शेवटच्या षटकात ३३ धावांची गरज होती. हे षटक दिल्लीकडून इशांत शर्माने टाकले. त्याचे पहिल्या तीन चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने एक षटकार आणि एक चौकार मारला. त्यानंतर चौथा चेंडू इशांतने फुल टॉस टाकला. ज्याला मैदानावरील पंचांनी कंबरेच्यावर असल्याचे मानले आणि त्याला नो बॉल घोषित केला.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

दिल्ली कॅपिटल्सने रिव्ह्यू घेतला, त्यानंतर थर्ड अंपायरने सर्वांना चकित केले –

अंपायरच्या या निर्णयावर डेव्हिड वॉर्नर आणि इशांत शर्मा नाराज दिसले आणि संघाने नो बॉलबाबत रिव्ह्यू घेतला. प्रकरण थर्ड अंपायरपर्यंत पोहोचले. बॉल ट्रॅकरच्या मते, चेंडू कंबरेच्या थोडा वर होता, त्यामुळे मैदानी अंपायरला नो बॉलच्या आपल्या निर्णयावर ठाम राहण्यास सांगितले. यानंतर लिव्हिंगस्टोनने षटकार ठोकला. अशा प्रकारे संघाला एकूण सात धावा मिळाल्या. मात्र, असे असूनही पंजाब किंग्जला विजय मिळवता आला नाही.

हेही वाचा – PBKS vs DC: दिल्लीविरुद्ध शिखर धवनने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, गौतम गंभीर-पार्थिव पटेलच्या ‘या’ क्लबमध्ये झाला सामील

चाहत्यांना झाली या दोन सामन्यांची आठवण –

ही घटना घडल्यानंतर चाहत्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील ५ दिवसांपूर्वी झालेल्या सामन्याची आठवण झाली. या सामन्यात आवेश खानचा चेंडू अब्दुल समदच्या कमरेच्या वर जात होता, तरीही अंपायरने त्याला योग्य चेंडू असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, ३० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या कंबरेवरून चेंडू बाहेर येत होता, परंतु तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला योग्य चेंडू असल्याचे म्हटले होते.

पंजाब किंग्जला १५ धावांनी पराभव पत्कारावा लागला –

या सामन्याबद्धल बोलायचे, तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ (५४) आणि डेव्हिड वॉर्नर (४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. यानंतर रुसोने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याने शानदार फलंदाजी करताना नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने २ बाद २१३ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – PBKS vs DC: डेव्हिड वार्नरने आयपीएलमध्ये रचला मोठा विक्रम! एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा ठरला फलंदाज

प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्जने ५० धावांपर्यंत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर अथर्व तायडे (५५) आणि लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतके झळकावली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. संघाला २० षटकात ८ बाद १९८ धावा करता आल्या. त्यामुळे पंजाब किंग्जला १५ धावांनी पराभव पत्कारावा लागला.