IPL 2024 RCB Playoff Celebration: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी (१८ मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून मोठा चमत्कार घडवला. आरसीबीने तब्बल आठ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता बंगळुरू प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे. बंगळुरूच्या या दमदार विजयानंतर मैदानात विराट कोहली अत्यंत भावूक झाल्याचा दिसून आले. इतर खेळाडूंनीही एकमेकांना मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. आरसीबीच्या चाहत्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. बंगळुरूच्या रस्त्यावर रात्री उशिरा चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. चाहते बस आणि कारच्या छतावर चढून मनसोक्त नाचताना दिसले; तर काही चाहते पाणी उडवीत बेभान होत घोषणा देत होते. याच सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेंगळुरूच्या रस्त्यावरील ‘हे’ दृश्य पाहाच

आरसीबीच्या बसच्या मागे अनेक किलोमीटरपर्यंत चाहत्यांची गर्दी होती. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते. कोणी बसच्या छतावर उभे राहून नाचत होते; तर खाली शेकडोंचा जमाव आपापल्या पद्धतीने विजय साजरा करत होता. कुठे नाच केला जात होता; तर कुठे फटाके फोडले जात होते. रात्री उशिरापर्यंत बंगळुरूच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी हे दृश्य पाहायला मिळाले. केवळ बंगळुरूतूनच नव्हे, तर कर्नाटकातील विविध शहरांमधूनही उत्सवाचे दृश्य समोर येत आहे.

आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदविणाऱ्या आरसीबीने सलग सहा सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले. फाफ डू प्लेसीसच्या नेतृत्वाखालील आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सीएसकेचा पराभूत करणे आवश्यक होते. सामन्याच्या दिवशी आरसीबीच्या खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण होते आणि त्यांनी शेवटपर्यंत उत्साह टिकवून ठेवीत चाहत्यांना विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी दिली.

धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही? जिवलग मित्र सुरेश रैना एकाच शब्दात म्हणाला…; पाहा VIDEO

आरसीबीच्या चाहत्यांचे जंग्गी सेलिब्रेशन

आरसीबीच्या विजयानंतर फ्रँचायजीने त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला, जो आता तुफान व्हायरल होत आहे. आरसीबीच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, चाहते स्टेडियमपासून हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर उभे आहेत आणि आपल्या आवडत्या क्रिकेट स्टार्सची झलक पाहायला मिळेल या आशेने दोन्ही हात हलवीत आहेत. आरसीबीचा विजय पाहून चाहते फारच आनंदी झाले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans storm bengaluru streets burst crackers chant kohli kohli after rcbs win over csk to enter playoffs netizens say win thetrophy first sjr