Fast bowler Mustafizur Rahman injured : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात दोन संघांना एकत्रितपणे मोठा धक्का बसला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजी करताना क्रॅम्पमुळे खेळपट्टीवर पडला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. या गोलंदाजाच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात मुस्तफिजुर रहमान चांगली गोलंदाजी करत होता. त्याने ९ षटकांत २ बळी घेतले होते. पण ४२ व्या षटकात गोलंदाजी करताना क्रॅम्पमुळे खेळपट्टीवर पडला. ४२ व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकताना ही घटना घडली. मात्र, असे असतानाही तो ४८ वे षटक टाकण्यासाठी आला. जिथे त्याला अधिक समस्यांना सामोरे जावे लागले.

तो ४८ व्या षटकाच्या रूपात शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याला थोडे अस्वस्थ वाटले आणि क्रॅम्पमुळे खाली पडला. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक मैदानावर आले. मुस्तफिझूरची प्रकृती खराब होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदाना बाहेर नेण्यात आले. मात्र, मुस्तफिझूरचे उर्वरित षटक सौम्या सरकारने पूर्ण केले.

हेही वाचा – Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट

आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेनंतर युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाला दुखापत झाली होता. आता या यादीत मुस्तफिजुर रहमानचेही नाव समाविष्ट झाले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. मुस्तफिझूर वेळेपूर्वी तंदुरुस्त होईल अशी आशा फार कमी आहे. त्यामुळे चेन्नईसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast bowler mustafizur rahman has injured his leg due to cramp in ban vs sl 3rd odi match vbm