Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates:आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कोलकात्यासमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य कोलकाता संघाने रिंकू सिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर सात गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरातचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे.
शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या (जीटी) जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची कहाणी तुम्हाला रडवू शकते. पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला रिंकू कधी कधी झाडूही मारायचा. पैशांच्या कमतरतेचा सामना करत असतानाही त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न सोडले नाही. आता त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) सामना जिंकणारी कामगिरी केली आहे.
वडील सिलिंडर वितरणाचे काम करतात –
१२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलिगढ, यूपी येथे जन्मलेल्या रिंकू सिंगचा क्रिकेट प्रवास इतका सोपा नव्हता. रिंकू सिंग पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे. अशा स्थितीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रिंकूची क्रिकेटर बनण्याची स्वप्न धुळीस मिळू लागले होते. आयपीएलमध्ये निवड झाल्याने सुधारणा झाली.
रिंकू फारसा शिकलेला नाही –
हताश झालेल्या रिंकू सिंगने एके दिवशी नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतला, पण फारसे शिकलेला नसल्यामुळे रिंकूला झाडू मारण्याचे काम मिळत होते. यानंतर रिंकू सिंगने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीजमध्ये बाईक मिळाली, ती त्याने वडिलांच्या दिली.
रिंकू सिंगने कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला –
या सामन्यात गुजरातचा संघ सहज सामना जिंकेल असे सर्वांना वाटत असताना, त्यावेळी रिंकू सिंगने १९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचून कोलकात्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १धाव घेत रिंकूला स्ट्राइक दिली. रिंकूने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑफ आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार खेचून सामना रोमांचक केला.
त्यानंतर रिंकूने लाँग ऑफच्या चौथ्या चेंडूला आणि पाचव्या चेंडूला लाँग ऑनला षटकार देऊन सामना पूर्णपणे कोलकात्याच्या दिशेने वळवला. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी ४ धावांची गरज होती आणि हा चेंडू षटकारापर्यंत पोहोचवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्याचे काम रिंकू सिंगने केले.