Ladakh Football Stadium: लडाखची ओळख म्हणजे त्याचे सौंदर्य. सुंदर पर्वत, बर्फाच्छादित हिमालय, लडाख या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. मात्र आता हे क्षेत्र क्रीडा क्षेत्रात पुढे येताना दिसत आहे. देशातील सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम या प्रदेशात बांधले गेले असेल तर ते फक्त लडाखमध्येच बांधले गेले आहे. लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर फुटबॉल स्टेडियम बांधण्यात आले आहे. जगातील १० सर्वोच्च स्टेडियममध्ये या स्टेडियमचा समावेश आहे. लवकरच हे मैदान लडाखच्या पहिल्या व्यावसायिक फुटबॉल क्लब – १ लडाख एफसीचे होम ग्राउंड बनेल.

भारतीय फुटबॉलचे त्याला नवे डेस्टिनेशन म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र या क्लबचा फोकस केवळ मैदानावर सामना जिंकण्यावर नसून मैदानाबाहेर हिरवळ पसरवण्यावर आहे. या क्लबने सर्वात स्वच्छ आणि प्रदूषण विरहीत ग्रीन फुटबॉल क्लब बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या क्लबने २०२५ पर्यंत निव्वळ शून्य कार्बनचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे.

Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हे काम नुकतेच सुरु झाले आहे

या क्लबने अजून आपले पायही नीट पसरवलेले नाहीत, संपूर्ण देशात सामनेही खेळलेले नाहीत. अशा परिस्थितीत या क्लबने निश्चित केलेले लक्ष्य त्यांच्यासाठी खूप कठीण असू शकते. परंतु क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एकाने इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “त्यांनी त्यांच्या ध्येय-उदिष्टांवर मार्गक्रमण करत प्रकल्पाकडे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संघातील खेळाडू डॅनिश ब्रँडचे. त्याने एक किट परिधान केले असून जे इको-फ्रेंडली अशा प्रकारचे आहे. याशिवाय, क्लबचे खेळाडू लेहमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण मैदानावर सायकलने जातील, असे लक्ष्य संपूर्ण क्लबने ठेवले आहे.”

हेही वाचा: IPL 2023: माजी इंग्लिश दिग्गजाने कॉमेंट्री दरम्यान केला ‘नागीण’ डान्स, चाहत्यांना बसला धक्का; पाहा Video

लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष साथी ग्यालसन यांनी सांगितले की, “असा उपक्रम ही काळाची गरज आहे.” ते म्हणाले की, “लडाखमध्ये हिमनद्या गायब होत आहेत आणि त्यामुळे लोक इतर गावांमध्ये स्थलांतरित होत आहेत. हिमवर्षावाच्या वेळेतही बदल झाले आहेत आणि आता बर्फवृष्टीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे, ही या भागासाठी चांगली गोष्ट नाही. ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने आणि तापमान -२९ अंशांवर गेल्याने येथे श्वास घेणे कठीण झाले आहे.”

लडाखमध्ये फुटबॉलला चालना मिळत आहे

गेल्या वर्षभरापासून लडाखमध्ये फुटबॉलला खूप चालना मिळाली आहे. गेल्या वर्षी, लडाखला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) सदस्यत्व मिळाले, जे त्याच्या विकासातील पहिले पाऊल होते. यानंतर लडाखने संतोष ट्रॉफीही खेळली. या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात शानदार खेळ दाखवत उत्तराखंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली.

हेही वाचा: KKR vs RCB: टॉस दरम्यान नेमकं काय झालं? यामुळे नितीश राणा फाफ डु-प्लेसिसवर भडकला, Video व्हायरल

महिला फुटबॉलही येथे मागे नाही. संतोष ट्रॉफीपूर्वी, २०१९ मध्ये स्थापन झालेल्या लडाखने १७ वर्षांखालील महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला संघ पाठवला होता. असोसिएशनचे सरचिटणीस सेरिंग अँग्मो यांनी सांगितले की, “लडाखमध्ये फुटबॉल नेहमीच खेळला जात होता परंतु केवळ छंद म्हणून त्यामुळे पायाभूत सुविधाकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. फुटबॉल असोसिएशनच्या स्थापनेनंतर या भागात ३३ फुटबॉल क्लब तयार झाले.

Story img Loader