Cameron Green’s century breaks record: आयपीएल २०२३ मध्ये ६९ साखली सामने पूर्ण झाले आहेत आणि आता शेवटचा सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्समध्ये सुरू आहे. या मोसमात सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहेत. अनेक अर्थांनी हा मोसम आतापर्यंत ऐतिहासिक ठरला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने ४७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्यामुळे मुंबईने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादचा ८गडी राखून पराभव केला. या मोसमातील हे ९वे शतक होते, यापूर्वी या मोसमात आठ खेळाडूंनी शतक झळकावले होते.

जर आपण एका मोसमात जास्तीत जास्त शतके करण्याबद्दल बोललो, तर आयपीएलचा चालू हंगाम अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल २०२२ म्हणजे गेल्या मोसमात ८ शतके झळकावली. पण या हंगामात पाच सामने (चार प्लेऑफ) शिल्लक असताना सर्व मोसमातील विक्रम मोडले आहेत. या मोसमात ९ शतके झाली आहेत. या प्रकरणात, हा हंगाम शीर्षस्थानी आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

आयपीएल २०२३ मध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी –

१. हॅरी ब्रूक २.व्यंकटेश अय्यर ३.यशस्वी जैस्वाल ४.सूर्यकुमार यादव ५.प्रभसिमरण सिंग ६.शुबमन गिल ७.हेनरिक क्लासेन ८.विराट कोहली ९.कॅमेरुन ग्रीन

हेही वाचा – MI vs SRH: वानखेडे मैदानात कॅमरून ग्रीनचं वादळी शतक, हैदराबादचा पराभव करून मुंबईने फडकवला विजयाचा झेंडा

आयपीएलच्या कोणत्या मोसमात सर्वाधिक शतके झळकावली?

आयपीएल २०२३ – ९ शतके (५ सामने बाकी)
आयपीएल २०२२ – ८ शतके
आयपीएल २०१६ – ७ शतके
आयपीएल २००८, २०११, २०१२ आणि २०१९ – ६ शतके
आयपीएल २०१७, २०१८ आणि २०२० – ५ शतके
आयपीएल २०१०, २०१३, २०१५ आणि २०२१ – ४ शतके
आयपीएल २०१४ – ३ शतके
आयपीएल २००९ – २ शतके

आता या मोसमातील शेवटचा साखळी सामना सुरू असून त्यानंतर प्लेऑफसाठी चार सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामात बरेच काही घडले ज्याने सर्व विक्रम मोडीत काढले. जर आपण जास्तीत जास्त २०० पेक्षा जास्त धावा करण्याबद्दल बोललो, षटकारांच्या आकड्यांबद्दल बोललो, शेवटच्या षटकातील विजयाबद्दल बोललो, तर हे सर्व असे विक्रम आहेत, जिथे या मोसमाने मागील सर्व हंगामांना मागे टाकसे आहे. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. त्याआधी, २३ मे रोजी क्वालिफायर १, २४ मे रोजी एलिमिनेटर आणि २६ मे रोजी क्वालिफायर २ खेळला जाईल.

Story img Loader