Mohammad Kaif’s Squad for T20 World Cup 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामानंतर लगेचच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा आयोजित खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी एप्रिल अखेरीस भारतीय संघाची निवड केली जाईल. टीम इंडियाचा २०१३ नंतरचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून आपली छाप सोडायची आहे. अशात माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टी-२० विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.

सॅमसन-किशनला स्थान देण्यात आले नाही –

भारतीय संघात किमान १० ते १२ खेळाडूंचे स्थान निश्चित झाले आहे. काही जागांसाठी अनेक दावेदार पुढे आले आहेत. मोहम्मद कैफने स्टार स्पोर्ट्स शो ‘फॉलो द ब्लूज’ मध्ये टी-२० विश्वचषकासाठी संभाव्य १५ खेळाडूंबद्दलची आपली टीम सादर केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून फक्त ऋषभ पंतला स्थान दिले आहे. त्याने संजू सॅमसन किंवा इशान किशनला स्थान दिलेले नाही. तर चौथा फिरकीपटू युजवेंद्र चहल असेल. रिंकू सिंगच्या जागी कैफने फिनिशरच्या भूमिकेत रियान परागची निवड केली आहे.

BCCI Announces 5 Crore Cash Prize For India U19 Womens Team for Winning T20 World Cup
U19 World Cup 2025: भारताच्या U19 मुलींचा विश्वविजेता संघ झाला मालामाल, BCCIने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat most runs record in tournament
U19 T20 WC 2025 : गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
India Women's Won U19 T20 World Cup 2025 2nd Time in a Row vs South Africa
India Won U19 Women’s T20 WC: भारताच्या महिला संघाने घडवला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले U19 टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
India vs England 3rd T20 Highlights Updates in Marathi
India vs England T20 Highlights : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय, बेन डकेटने झळकावले अर्धशतक
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Arshdeep Singh Announces as ICC Mens T20I Cricketer of the Year 2024
ICC Men’s T20I Cricketer of the Year 2024: सिंग इज किंग! भारताचा अर्शदीप सिंग ठरला सर्वात्कृष्ट टी-२० खेळाडू २०२४; ICCने केली घोषणा

मोहम्मद कैफची प्लेइंग इलेव्हन –

प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “यशस्वी जैस्वाल रोहित शर्माबरोबर ओपनिंग करेल. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर, हार्दिक पंड्या पाचव्या आणि ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर असेल. मी अनेक अष्टपैलू खेळाडू ठेवीन. कारण आपल्याला फलंदाजीत सखोलता हवी आहे. म्हणून मी अक्षर पटेलला सातव्या आणि रवींद्र जडेजाला आठव्या क्रमांकावर ठेवले आहे. त्यानंतर कुलदीप यादव नवव्या क्रमांकावर असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे दोन वेगवान गोलंदाज असतील.”

हेही वाचा – PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

अश्विनऐवजी चहल का संधी द्यावी?

मोहम्मद कैफ म्हणाला, “भारतीय संघाबद्दल बोलायचे तर आपल्याला आणखी एक फिरकीपटू घ्यावा लागेल. त्यासाठी मला वाटत संघात युजवेंद्र चहलला संधी द्यावी लागेल. कारण तो लेगस्पिनरचा एक उत्तम पर्याय आहे. अश्विन गेल्या वेळी गेला होता. यावेळी तो आयपीएलमध्ये जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरलेल नाहीये. त्यामुळे माझा विश्वास आहे की चहल हा चेंडू फिरेल अशा खेळपट्टीवर खूप चांगला गोलंदाज आहे.”
शिवम दुबेला १५ सदस्यीय संघात ठेवण्याच्या प्रश्नावर कैफ म्हणाला, “मी शिवम दुबेसोबत जाईन, तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि उत्कृष्ट फिरकी खेळतो. पॉवरप्लेच्या षटकांनंतर तो चांगली फटकेबाजी करतो. यानंतर मी रियान परागला प्राधान्य घेईन. तो असाधारणपणे चांगला खेळत आहे आणि संघात येण्यास पात्र आहे. तसेच मी मोहम्मद सिराजचे नाव घेईन. तो फॉर्मात नाही, पण तो एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.”

हेही वाचा – IPL 2024 : लसिथ मलिंगासह ‘या’ पाच गोलंदाजांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना केलय शून्यावर बाद

टी-२० विश्वचषक २०२४ साठी मोहम्मद कैफचा भारतीय संघ:

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, शिवम दुबे, रियान पराग आणि मोहम्मद सिराज.

Story img Loader