Akash Chopra has been found corona positive: माजी भारतीय खेळाडू, प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट तज्ञ आकाश चोप्रा करोनाच्या विळख्यात आला आहे. स्वतः प्रसिद्ध समालोचकाने ही माहिती दिली. त्याने सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टद्वारे याचा खुलासा केला. आकाश चोप्राने सांगितले की, आता तो काही दिवस आयपीएल २०२३ मध्ये कॉमेंट्री करू शकणार नाही. त्याचबरोबर त्याने एक ट्विटही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल आकाश आयपीएल २०२३ मध्ये जिओ सिनेमासाठी हिंदी कॉमेंट्री करत होता. आपली कम्युनिटी पोस्ट शेअर करताना, आकाश चोप्राने लिहिले, “व्यत्ययाबद्दल क्षमस्व… कोविडने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. काही दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. येथे देखील सामग्री थोडी कमी असू शकते. घसा खवखवणे… मग आवाजाची लोचा. बघा भावांनो… वाईट वाटू घेऊ नका. लक्षणे सौम्य आहेत. देवाचे आभार.”

ट्विटरवरही दिली माहिती –

याशिवाय या दिग्गजाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ही माहिती शेअर केली आहे. त्यानी ट्विटमध्ये लिहिले, “होय… (कोविड) विषाणूने पुन्हा हल्ला केला आहे. लक्षणे अतिशय सौम्य आहेत. सर्व काही नियंत्रणात आहे. काही दिवस कॉमेंट्री ड्युटीपासून दूर राहीन… दमदार पुनरागमन करण्याची आशा.”

हिंदीतील प्रसिद्ध समालोचकांपैकी एक –

आकाश चोप्रा हिंदीतील प्रसिद्ध समालोचकांपैकी एक आहे. त्याने आपल्या अप्रतिम कॉमेंट्रीने सर्वांना वेड लावले आहे. आयपीएल २०२३ पूर्वी जिओ सिनेमाने त्याच्याशी करार केला. यापूर्वी तो स्टार सपोर्ट नेटवर्कसाठी काम करत होता.

हेही वाचा –

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला आहे –

विशेष म्हणजे, आकाश चोप्राने ऑक्टोबर २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच वेळी, ऑक्टोबर २००४ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या एक वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आकाशने एकूण १० कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने फलंदाजी करताना २३ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या. यामध्ये त्याने २ अर्धशतके झळकावली असून ६० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former player and famous commentator akash chopra has been found corona positive in ipl 2023 vbm