Prithvi Shaw Out Of Form In IPL 2023 : एखाद्या फलंदाजाची वेळ किती वेगानं बदलते, पृथ्वी शॉ याचं एक मोठं उदाहरण आहे. घरेलू क्रिकेटमध्ये तसेच राष्ट्रीय सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीत पृथ्वी शॉने धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण आयपीएलमध्ये येताच त्याची दुनियाच बदलली. दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील सहा सामन्यात पृथ्वी शॉ धावा करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. शॉने या सामन्यांमध्ये एकदाही २० धावसंख्येचा टप्पा पार केला नाहीय. कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात पृथ्वी पुन्हा स्वस्तात माघारी परतला. वरुण चक्रवर्तीने फेकलेल्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी १३ धावांवर असताना क्लीन बोल्ड झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर फनी मीम्सचा वर्षाव झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा – PBKS vs RCB: IPL मध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला आयपीएलमधील एकमेव फलंदाज

गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२३ मधील २८ वा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने केकेआरचा ४ विकेट्सने पराभव करून आयपीएलमधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून केकेआरचा आख्ख्या संघाला १२७ धावांवर गारद केलं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचीही केकेआरच्या गोलंदाजांनी दमछाक केली. कारण १२८ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीला १९.२ षटक खेळावे लागले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny memes on social media as prithvi shaw out of form in ipl 2023 dc vs kkr scorecard update nss