इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाड घातली. दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि अन्य ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. रविवारी सकाळी मंगळुरू पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. चार व्यक्तींना या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २१.२० एवढी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. मंगळुरूमधील जेल रोड परिसरात आयपीएलच्या सुरू असलेल्या सामन्यांवर काही व्यक्ती सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. श्रीजित शेट्टी, प्रजीत, प्रशांत आणि राजेश अशी या चार व्यक्तींची नावे आहेत. गाडी, दुचाकी, सहा भ्रमणध्वनी, लॅपटॉप हा ऐवज जप्त करण्यात आला.
शुक्रवारी फरिदाबाद येथे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील लढतीवर सट्टा लावणाऱ्या नऊ व्यक्तींना अटक करण्यात आली. या लोकांकडून देशी पिस्तूल, काडतुसे, दूरचित्रवाणी संच, सेट टॉप बॉक्स आणि ६,९०० रुपये ताब्यात घेण्यात आले.

Story img Loader