Gautam Gambhir Reaction On Virat Kohli Rajat Sharma: विराट कोहली व गौतम गंभीर यांच्यातील वाद आता पुन्हा वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आयपीएल २०२३ चा ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. इकाना स्टेडियममध्ये बंगळुरुने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला पण यानंतर LSG उल हक, मेंटर गौतम गंभीर व आरसीबीचा विराट कोहली यांच्यात तुफान बाचाबाची झाली. दोन दिवांपासून हे भांडण स्टेडियममधून बाहेर येऊन सोशल मीडियावर पोहोचलं आहे. आणि आता स्वतः गंभीरने सुद्धा या भांडणावर टोमणे मारणारी प्रतिक्रिया दिली आहे. पण मुळात गौतम गंभीरचा टोमणा हा विराटला कमी व इंडिया टीव्हीचे पत्रकार रजत शर्मा यांना जास्त होता असे बोलले जात आहे. नेमकं रजत शर्मा यांचं नाव मध्ये कुठे आलं हे पाहूया…
विराट- नवीन- गौतम या भांडणावर भाष्य करताना रजत शर्मा यांनी गंभीरला “अहंकारी आणि गर्विष्ठ’ म्हटले होते तसेच गंभीरचे वर्तन योग्य नाही, माजी खेळाडू किंवा खासदार म्हणूनही नाही.”असेही विधान त्यांनी केल्याचा व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत आहे.
दोन खेळाडूंमधील भांडणावर बोलताना ते म्हणाले, “निवडणूक जिंकून खासदार झाल्यानंतर गौतम गंभीरचा अहंकार वाढला आहे. विराट कोहलीच्या प्रसिद्धीबद्दलची त्याची ईर्षा स्पष्टपणे दिसून आली. विराट कोहली असा आहे जो नेहमीच आक्रमक राहतो आणि कोणताही मूर्खपणा सहन करत नाही आणि म्हणूनच त्याने गौतम गंभीरला चोख प्रत्युत्तर दिले. पण एकंदरीत, गंभीरचे वागणे खेळाविरुद्ध होते आणि ते माजी खेळाडू किंवा संसद सदस्याला शोभत नाही. अशा घटनांमुळे क्रिकेटचे स्पिरिट बिघडते आणि त्यामुळे असं व्हायला नको होतं.”
तर यावरून बुधवारी, गंभीरने ट्विटरवर अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्यावर ‘बातमीच्या नावावर पीआर केल्याचा’ आरोप केला. गंभीर लिहितो की “दबावाच्या नावाखाली DDCA अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे, क्रिकेटची चिंता म्हणून पैसे घेऊन पीआर करण्यास उत्सुक दिसत आहे, हे कलियुग आहे जिथे पळकुटे ‘अपनी अदालत’ चालवत आहेत.”
गौतम गंभीर ट्वीट
हे ही वाचा<< “जर झेपत नसेल…” गंभीरशी भांडून विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये आला अन्… आरसीबीने Video केला ट्वीट
दरम्यान, आयपीएलमध्ये सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना संपल्यानंतर एलएसजीचे मार्गदर्शक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि आरसीबीचा खेळाडू विराट कोहली यांच्यात भांडण झाले. दोघे मैदानावर जोरदार वादावादी करताना दिसले तर दोन्ही संघातील इतर खेळाडूंनी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंनी या घटनेवर थेट भाष्य केलेले नाही पण दोन्हीकडून अप्रत्यक्ष टोलेबाजी सुरु आहे