आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफसाठी पात्र होणारा कोलकाता नाईट रायडर्स हा पहिला संघ ठरला. विजयीरथावर स्वार असलेला केकेआरचा संघ कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करत आहे. इतकंच नव्हे तर केकेआरने क्वालिफायरचे तिकीटही मिळवले आहे आणि हा हंगाम संपेपर्यत कोलकाताचा संघ टॉप-२ मध्येच राहणार आहे. यंदाच्या मोसमात केकेआरचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला गौतम गंभीर मेंटॉरच्या रूपात पुन्हा एकदा संघामध्ये परतला. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली. गंभीर हा फार कमी वेळेस दिलखुलास हसताना आपल्याला दिसतो. गौतम गंभीर संघाच्या कामगिरीवर खूश असला तरी गंभीरला आपण फार कमी वेळेस हसताना पाहिलं आहे. यादरम्यान केकेआरच्या एका सामन्यात त्याच्या चाहतीने एक पोस्टर घेतलेला फोटो व्हायरल होत आहे, ज्याला आता गंभीरने उत्तर दिले आहे.

स्टेडियममध्ये एक चाहती गौतम गंभीरचे पोस्टर घेऊन उभी असल्याचे दिसले, ‘जोपर्यंत गंभीर हसत नाही तोपर्यंत मी माझ्या क्रशला प्रपोज करणार नाही’, असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं, हे पाहून गौतम गंभीरनेही एक पोस्ट शेअर केली. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एका बाजूला गंभीर हसत आहे तर दुसऱ्या बाजूला पोस्टरसोबत त्या चाहतीचा फोटो आहे. गंभीरने पोस्टमध्ये लिहिले की, ‘हे बघ.’

people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

हेही वाचा – RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?

गौतम गंभीरची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. गंभीरच्या प्रशिक्षणाखालील केकेआऱच्या संघाने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. गंभीर गेल्या २ वर्षांपासून लखनऊ सुपर जायंट्सशी जोडला होता. दोन्ही वेळा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. आता या मोसमात गंभीर त्याच्या जुन्या संघात परतला आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०१४ मध्ये केकेआरने चेन्नईचा तर २०१२ मध्ये पंजाबचा पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. यंदाही आय़पीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी केकेआरचा संघ सर्वात मोठा प्रबळ दावेदार आहे.

आतापर्यंत केकेआर संघाने १३ सामन्यांत ९ वेळा विजय मिळवला आहे तर केवळ ३ सामने गमावले आहेत. या कामगिरीमुळे केकेआर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. संघातील सर्वच खेळाडू चांगले फॉर्मात असून यंदाच्या ट्रॉफीवर केकेआर आपले नाव कोरेल अशी शक्यता आहे.