Gautam Gambhir Reaction To RCB Fans Video Viral : टीम इंडियात खेळत असताना भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर त्याच्या कठो स्वभावामुळं नेहमीच चर्चेत असायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगमध्येही गौतम गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण सामना अटीतटीचा झाल्यास गौतमच्या चेहऱ्यावरील हावभाव कॅमेरात कैद होतात आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतो. अशाच प्रकारचा गंभीरचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात श्वास रोखून धरणारा सामना रंगला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनऊला विजयासाठी एका चेंडूत एक धावेची गरज होती. त्यावेळीही आरसीबीचे चाहते स्टेडियमध्ये जोरजोरात आरसीबी आरसीबी असं म्हणत टीमला चिअर अप करत होते. पण शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळाल्यानंतर लखनऊचा विजय झाला आणि डगआऊटमध्ये बसलेल्या गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना गप्प केलं. चाहत्यांना शांत राहण्यासाठी गौतमने केलेला इशारा कॅमेराबद्ध झाला आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.

नक्की वाचा – Video: फाफ डु प्लेसिसने ठोकला सर्वात लांब षटकार, चेंडू थेट स्टेडियमबाहेरच गेला, विराट कोहलीही झाला थक्क

इथे पाहा व्हि़डीओ

दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने धावांचा पाऊस पाडला. फाफने ४६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार ठोकून ७९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पण आख्ख्या स्टेडियममध्ये चर्चा रंगली ती फक्त फाफने मारलेल्या गगनचुंबी षटकाराची. लखनऊ सुपर जायंट्सचा लेग स्पिनर रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर फाफने जोरदार फटका मारत सर्वात लांब षटकार मारला. ११५ मीटर लांबीचा हा षटकार असल्याने चेंडू थेट स्टेडिमयबाहेर गेला. फाफने मारलेल्या या षटकाराची आयपीएलमधील सर्वात लांब षटकारांच्या इतिहासात नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir stern reaction over rcb fans cheer up video clip went viral on twitter lsg wins against rcb nss
Show comments