आयपीएएलच्या पंधराव्या हंगामातील ३० वी लढत चांगलीच थरारक ठरली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव झाला. तर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे या सामन्यात राजस्थानचा विजय झाला. केकेआरने विजयासाठी शेवटपर्यंत लढा दिला. त्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने ५१ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या. याच कारणामुळे केकेआरचा पराभव झाला असला तरी श्रेयसची वाहवा होत आहे. फक्त स्टेडियमच नव्हे तर स्टेडियमच्या बाहेरही श्रेयस अय्यरवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एका तरुणीने तर श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> RR vs KKR : पती युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं भन्नाट सेलिब्रेशन, प्रेक्षक गॅलरीतील व्हिडीओ व्हायरल

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. सध्या एका तरुणीने श्रेयस अय्यरला लग्नाची मागणी घातली आहे. तिने हातात पोस्टर घेत माझ्याशी लग्न करशील का ? असं विचारलं आहे. विशेष म्हणजे तरूणीचा हा फोटो कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तरुणीची ही मागणी पाहून नेटकरी तसेच केकेआरचे फॅन्स भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार

तरुणीने पोस्टरवर काय लिहिले आहे ?

केकेआरच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर या तरुणीचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. तिच्या हातात एक पोस्टर आहे. या तरुणीने पोस्टवर “माझ्या आईला माझं लग्न करायचं आहे. त्यामुळे तिने मला मुलगा शोधायला सांगितला आहे. श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का ?” असे या तरुणईने पोस्टरवर लिहिलेले आहे. तरुणीने श्रेयसला थेट लग्नाचीच मागणी घातल्यामुळे तिची चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> KKR vs RR : प्रसिद्ध कृष्णा आणि अ‍ॅरॉन फिंच यांच्यात बाचाबाची; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि केकेआर या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी विजय झाला. तर २१८ धावांचा पाठलाग करताताना केकेआरला २१० धावा करता आल्या. या सामन्यात श्रेयसने ८५ धावा केल्या.