Glenn Maxwell and Josh Hazlewood:आयपीएल २०२३ सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एक वाईट बातमी येत आहे. संघाचे दोन स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड हे स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत. हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत.

जोश हेझलवूड पायाच्या दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता, तर ग्लेन मॅक्सवेल अद्याप गेल्या वर्षीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. मॅक्सवेलने या महिन्यात भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत भाग घेतला होता, मात्र या मालिकेतील शेवटचे दोन सामने तो खेळू शकला नाही.

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू मधील वृत्तानुसार, हेझलवुड टी-२० स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात खेळेल अशी अपेक्षा आहे. सध्या तो अकिलीसच्या समस्येतून बरा असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी हेझलवूड क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांशी सल्लामसलत करेल, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा – IPL 2023: ‘विराटचे आरसीबीसाठी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरणार’; ‘या’ माजी खेळाडूने केली भविष्यवाणी

दुसरीकडे, जर ग्लेन मॅक्सवेलबद्दल बोलायचे, तर तो आरसीबीच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरू संघ दोन एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मॅक्सवेल अद्याप त्याच्या जुन्या दुखापतीतून सावरला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरसीबीसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये या दोन प्रमुख खेळाडूंचे बाहेर पडणे हा मोठा धक्का मानला जात आहे. आता कर्णधार कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देतो हे पाहण्यासारखे आहे.

आयपीएल २०२३चा आरसीबी संघ:

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल

Story img Loader