Maxwell completes 1000 runs while playing for RCB: आयपीएल २०२३ चा ३२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टच्या जाळ्यात अडकला. यानंतर शाहबाज अहमदही बोल्टचा बळी ठरला, मात्र ग्लेन मॅक्सवेलसह फाफ डुप्लेसीने संघाचा डाव सांभाळला.
आरसीबीकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलचे हे १०वे अर्धशतक –
वास्तविक, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस मिळाला. या सामन्यात संघाच्या सुरुवातीच्या धक्क्यांनंतर त्याने दमदार अर्धशतकी खेळी करत खास क्लबमध्ये एंट्री केली आहे. संघासाठी १००० धावा पूर्ण करणारा ग्लेन आरसीबी संघातील पाचवा खेळाडू ठरला.आरसीबीसाठी संघासाठी १००० धावा पूर्ण करण्यात विराट कोहलीचे नाव सर्वात वर आहे. त्याने आतापर्यंत आरसीबीकडून खेळताना ६९०३ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्सचे नाव आहे, ज्याने ४४९१ धावा केल्या. ख्रिस गेलने ३१६३ आणि जॅक कॅलिसने ११३२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलचे हे १०वे अर्धशतक होते.
मॅक्सवेल आणि फाफसमोर राजस्थानचे गोलंदाज हतबल –
पहिल्या ६ षटकांच्या समाप्तीनंतर, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिसने वेगाने धावा करत राहिले, ज्यामुळे १० षटक संपल्यानंतर आरसीबीची धावसंख्या २ बाद १०१ धावांवर पोहोचली. मॅक्सवेलने अर्धशतक पूर्ण केले होते, तर फॅफनेही अर्धशतक झळकावले. यानंतर दोघांमध्ये ६६चेंडूत १२७ धावांची शतकी भागीदारी झाली.
आयपीएल इतिहासात आरसीबीसाठी १००० हून अधिक धावा करणारे खेळाडू –
विराट कोहली – ६९०३
एबी डिव्हिलियर्स – ४४९१
ख्रिस गेल – ३१६३
जॅक कॅलिस – ११३२
ग्लेन मॅक्सवेल – १०३१*
आरसीबीने नऊ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला आरसीबीकडून चांगली खेळी करता आली नाही. या दोघांशिवाय फक्त दिनेश कार्तिक (१६ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. प्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७धावा केल्या. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचबरोबर अश्विन आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.