IPL 2025 GT vs DC Highlights In Marathi: जोस बटलरची ९७ धावांची खेळी अन् राहुल तेवतियाचे अखेरच्या षटकातील फटकेबाजी अन् गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सने आणि ४ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला आहे. या विजयासह गुजरातच्या संघाने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच २०० अधिक धावांचं लक्ष्य गाठलं आहे आणि आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्याच स्थानी पोहोचला आहे.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला २०४ धावांचे आव्हान दिले होते. गुजरात संघाने हे आव्हान १९.२ षटकांत ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. जोस बटलरचे अवघ्या ३ धावांनी शतक हुकले आहे. पण संघाला मात्र त्याने विजय मिळवून दिला आहे. दिल्लीसाठी गेल्या सामन्यात हिरो ठरलेला मिचेल स्टार्क या सामन्यात मात्र पराभवाचं कारण ठरलं. स्टार्क या पूर्ण सामन्यात फ्लॉप होता.

मिचेल स्टार्कचं षटक ठरलं दिल्लीच्या पराभवाचं कारण

मिचेल स्टार्क हा दिल्ली कॅपिटल्सचा मॅचविनर खेळाडू आहे, पण या सामन्यात मात्र तो पूर्णपण फ्लॉप दिसला. स्टार्कने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये म्हणजेच ३.२ षटकांत ४९ धावा दिल्या पण एकही विकेट मिळवली नाही. स्टार्कच्या १५ व्या षटकात बटलरने त्याची धुलाई करत २० धावा केल्या. यामध्ये बटलरने सलग पाच चौकार लगावत सामन्याचा रोख आपल्या बाजूने वळवला. शेरफन रूदरफोर्ड आणि जोस बटलर यांची जोडी तोडण्यासाठी स्टार्कला पाचारण केलं होतं, पण त्याने १५व्या षटकात २० धावा देत सामना गुजरातच्या बाजूने वळवला. तर स्टार्कच्या अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर राहुल तेवतियाने षटकार चौकार लगावत सामना फिरवला.

गुजरातची सुरूवात धावांचा पाठलाग करताना चांगली झाली होती पण शुबमन गिल ७ धावांवर धावबाद झाला. साई सुदर्शनने २१ चेंडूत ५चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या तर जोस बटलरने ५४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारासह ९७ धावांची खेळी केली. बटलरचे शतक ३ धावांनी हुकले. यंदाच्या आयपीएल ९७ धावांवर नाबाद राहणारा बटलर अजून एक खेळाडू ठरला. तर शेरफेन रूदरफोर्डने बटलरला चांगली साथ दिली. तो ४३ धावा करत बाद झाला. तर राहुल तेवतियाने अखेरच्या षटकात येताच १ चौकार – षटकार लगावत गुजरातचा विजय निश्चित केला.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत २०३ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या सर्व फलंदाजांनी या मोठ्या धावसंख्येसाठी धावांचे योगदान दिले. अभिषेक पोरेल १८ धावा, करूण नायर ३१ धावा तर केएल राहुलने २८ धावांचं योगदान दिलं होतं. यानंतर कर्णधार अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. अक्ष पटेल ३९ धावा करत माघारी परतला.

तर ट्रिस्टन स्टब्सची वादळी खेळी ३१ धावांवर संपली. तर आशुतोष शर्मा याने पुन्हा आपल्या वादळी खेळीने प्रभावित केलं. आशुतोषने १९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. यासह अखेरच्या चेंडूवर कुलदीप यादवने चौकार लगावत संघाल २०० धावांचा टप्प गाठून दिला.

प्रसिध कृष्णाने ४ षटकांत ४१ धावा देत ४ विकेट्स घेतले. तर सिराज, अरशद खान, इशांत शर्मा आणि साई किशोर यांनी १-१ विकेट घेतली. साई किशोरला या सामन्यात १ अखेरचे षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या षटकात विकेट मिळवली.