IPL 2025 Gujarat Titans Full Squad and Schedule: आयपीएलमधील पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावणारा संघ म्हणून गुजरात टायटन्सने आपली ओळख तयार केली आहे. पाच खेळाडूंना रिटेन करणाऱ्या गुजरातने लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यांना ताफ्यात समाविष्ट केलं. यासह आता आयपीएल २०२५ साठी गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ कसा आहे? जाणून घेऊया
गुजरात जायंट्स संघाचे प्रशिक्षक पद भारताचा अनुभवी गोलंदाज आशिष नेहराकडे आहे. तर गुजरातच्या संघाने आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी कर्णधार शुबमन गिल, रशीद खान, राहुल तेवतिया, शाहरूख खान आणि युवा फलंदाज साई सुदर्शन या ५ खेळाडूंना संघाने रिटेन केलं होतं आणि त्यानंतर गुजरातने लिलावात चांगली गोलंदाजी फळी तयार केली.
सामने आणि जेतेपद पटकावयचं असेल तर गोलंदाजांची मजबूत फळी असायला हवी यावर प्रशिक्षक आशिष नेहरा यांचा भर असतो. याचाच भाग म्हणून त्यांनी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा यांना संघात घेतलं. या दोघांसाठी गुजरातला मोठी रक्कम मोजावी लागली. महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू, अनुज रावत आणि मानव सुतार या युवा खेळाडूंचा संचच गुजरातने खरेदी केली.
आयपीएल २०२५ लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने रिटेन केलेले खेळाडू
शुबमन गिल – १६.५० कोटी
रशीद खान – १८ कोटी
साई सुदर्शन – ८.५० कोटी
शाहरुख खान – ४ कोटी
राहुल तेवतिया – ४ कोटी
गुजरात टायटन्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Gujarat Titans IPL 2025 Full Squad)
शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.
गुजरात टायटन्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Gujarat Titans Match Schedule)
२५ मार्च – गुजरात जायंट्स वि. पंजाब किंग्स
२९ मार्च – गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स<br>२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. गुजरात जायंट्स
६ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात जायंट्स
९ एप्रिल – गुजरात जायंट्स वि. राजस्थान रॉयल्स
१२ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात जायंट्स
१९ एप्रिल – गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात जायंट्स
२६ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. गुजरात जायंट्स
२ मे – गुजरात जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद
६ मे – मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स
११ मे – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स
१४ मे – गुजरात जायंट्स वि. लखनौ सुपर जायंट्स
१८ मे – गुजरात जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स