IPL 2023, CSK vs GT Qualifier 1 Highlights: चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला आहे. यंदाच्या हंगामात सीएसके हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, गुजरातला केवळ १५७ धावाच करता आल्या. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.

गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलने ३८ चेंडूत ४२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. मात्र, राशिद खानने शेवटच्या षटकात १६ चेंडूत ३० धावांची झटपट खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईक़डून गोलंदाजी करताना दीपक चहर व्यतिरिक्त महिश तिक्ष्णा, रवींद्र जडेजा आणि महिषा पथिराना यांनी २-२ विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेला एक विकेट मिळाली.

वास्तविक बुधवारी एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा प्रवास संपणार आहे. मात्र, या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Live Updates
Qualifier 1, CSK vs GT Match Highlights: क्वालिफायर १, सीएसके विरुद्ध जीटी मॅच हायलाईट्स:
23:33 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत केला प्रवेश

चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला आहे. यंदाच्या हंगामात सीएसके हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, गुजरातला केवळ १५७ धावाच करता आल्या. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.

23:22 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: राशिद खान बाद

गुजरात टायटन्सची शेवटची आशाही संपली आहे. रशीद खान १६ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. गुजरातने १४२ धावांवर ९ विकेट गमावल्या आहेत.

23:12 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातच्या ७ विकेट पडल्या

१८ व्या षटकात गुजरातच्या दोन विकेट पडल्या आहेत. प्रथम विजय शंकरला गायकवाडने अप्रतिम झेल घेऊन पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. णि त्यानंतर नळकांडे धावबाद झाला. आता चेन्नईचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

23:11 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: राशिद खानची शानदार फटकेबाजी

राशिद खानने सामना रोमांचक केला आहे. गुजरातला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात ३९ धावा करायच्या आहेत. राशिद खान ११ चेंडूत २५ धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे. शंकरनेही १४ धावा केल्या आहेत.

22:52 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातला सहावा धक्का, राहुल तेवतियाही बाद

तेवटियाची जादू चालली नाही. गुजरातने १०० धावांवर ६ विकेट गमावल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा विजय आता जवळपास निश्चित झाला आहे. आजचा सामना जिंकल्यास धोनीच्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

22:45 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातच्या संघाला सर्वात मोठा धक्का, सलामीवीर शुबमन गिल ४२ धावांवर बाद

गुजरातची आणखी एक विकेट पडली आहे. गिल आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. गुजरातने १३.१ षटकात ८८ धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत.

22:41 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातच्या अडचणी वाढल्या, १३ व्या षटकांत बसला चौथा धक्का

गुजरातसाठी अडचणी वाढत आहेत. १२.५ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या चार विकेट गमावून ८४ धावा आहे. डेव्हिड मिलरच्या रुपाने चौथा धक्का बसला. तो ४ धावांवर बाद झाला.

22:31 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: हार्दिक पाठोपाठ शनाकाही बाद, गुजरातला बसला तिसरा धक्का

गुजरातला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शनाका बाहेर पडला आहे आणि पॅव्हेलियनमध्ये परत जात आहे. गुजरातची धावसंख्या १०.१ षटकात तीन विकेट गमावून ७२ धावा. मिलर क्रीजवर आला.

22:30 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: पॉवरप्लेमध्ये चेन्नईने गुजरातला दिले दोन धक्के

चेन्नई सुपरकिंग्जला महिष तेक्षानाने दुसरे यश मिळवून दिले. सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केले. हार्दिक सात चेंडूंत आठ धावा करून रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. अशा प्रकारे पॉवरप्लेमध्ये चेन्नईला दोन विकेट मिळाल्या. गुजरातने सहा षटकांत दोन गडी बाद ४१ धावा केल्या. शुबमन गिल १७ चेंडूत २० धावा करून नाबाद आहे. दासुन शनाकाने अद्याप खाते उघडलेले नाही.

22:09 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातला दुसरा धक्का, साहा पाठोपाठ कर्णधार हार्दिक पांड्या बाद

गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या निराश झाला. हार्दिक पंड्या 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतत आहे. ५.५ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या दोन गडी गमावून ४१ धावा आहे.

22:08 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातची पहिली विकेट पडली

गुजरातची सुरुवात खूपच खराब झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर साहा बाद झाला. तीन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एक विकेट गमावून २२ धावा आहे. शुबमन गिल अजूनही क्रीजवर आहे.

21:42 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातच्या डावाची संथ सुरुवात

गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि साहा यांनी पहिल्या षटकात ३ धावा केल्या. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जसाठी दीपक चहरने पहिले षटक टाकले.

21:38 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: शुबमन गिल आणि साहा यांच्यावर सर्वांच्या नजरा

पहिला क्वालिफायर सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्ससमोर १७३ धावांचे लक्ष्य आहे. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि साहा क्रीजवर आहेत.या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना २० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

21:24 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: चेन्नईचे गुजरातला १७३ धावांचे लक्ष्य

सीएसकेने २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान आहे. सीएसकेकडून गायकवाडने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. डेव्हॉन कॉनवेने ४० धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा केल्या.

अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने १७-१७ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक धाव काढली. चार चेंडूत नऊ धावा केल्यानंतर मोईन अली नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

21:16 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: धोनी एक धाव काढून बाद

आजच्या सामन्यात धोनी अपयशी ठरला. धोनी अवघी एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. १५५ च्या स्कोअरवर सीएसकेने ६ विकेट गमावल्या आहेत. एक ओव्हर बाकी आहे.

21:10 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: मैदानात एमएस धोनीची एन्ट्री

१८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रायुडूची विकेट पडली. १८ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या पाच विकेट गमावून १४८ धावा आहे. धोनी क्रीझवर आला आहे.

21:03 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: १७ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या ४ बाद १३७

१७ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या ४ बाद १३७ आहे. रवींद्र जडेजा आणि अंबाकी रायुडू प्रत्येकी ८-८ धावांवर खेळत आहे.

20:56 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: अजिंक्य पाठोपाठ डेव्हॉन कॉनवेही बाद

सीएसकेचा डाव कोलमडला आहे. सीएसकेने दोन षटकात दोन विकेट गमावल्या आहेत. कॉनवे ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सीएसकेची धावसंख्या चार गडी गमावून १२५ धावा आहे. १५.१ षटकांचा खेळ संपला.

20:53 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: रहाणेची बॅटही चालली नाही

या सामन्यात अजिंक्य रहाणे अप्रतिम कामगिरी करू शकला नाही. रहाणे १० चेंडूत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सीएसकेची धावसंख्या तीन विकेट गमावून १२१ धावा आहे. १४.५ षटकांचा खेळ संपला.

20:47 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: १४ षटकानंतर सीएसकेची धावसंख्या २ बाद १०७

१४ षटकानंतर सीएसकेने २ बाद १०७ धावा केल्या आहे. सध्या खेळपट्टीवर अजिंक्य ८ आणि डेव्हॉन कॉनवे ३५ धावांवर खेळत आहेत.

20:34 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: ऋतुराज गायकवाड पाठोपाठ शिवम दुबेही बाद

महत्त्वपूर्ण सामन्यात शिवम दुबेची बॅट निकामी झाली. दुबे तीन चेंडूत एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नूर अहमदने त्याची विकेट घेतली. 11.4 षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या दोन गडी गमावून 91 धावा आहे.

20:32 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसकेला पहिला धक्का! ऋतुराज गायकवाड बाद

४४चेंडूत ६० धावांची उत्कृष्ट खेळी केल्यानंतर गायकवाड बाद झाला. १०.३ षटकात सीएसकेची धावसंख्या एक विकेट गमावून ८७ धावा आहे. कॉनवे २५ धावा करून खेळत आहे. मोहित शर्माने गुजरातला पहिले यश मिळवून दिले आहे. शिवम दुबे फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

20:23 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: ऋतुराजचने झळकावले चौथे अर्धशतक

ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या चालू मोसमातील चौथे अर्धशतक झळकावले. गुजरातविरुद्ध त्याने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने नऊ षटकांत बिनबाद ७६ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड ३९ चेंडूत नाबाद ५६ तर डेव्हॉन कॉनवे १६ चेंडूत १८ धावा करून नाबाद आहे.

20:16 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: ऋतुराज गायकवाडची दमदार फटकेबाजी

गायकवाड आणि कॉनवे यांनी सीएसकेला चांगली सुरुवात करून दिली. ८ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या बिनबाद ६४ धावा आहे. गायकवाड आपल्या अर्धशतकाच्या जवळ असून ४६ धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे. गुजरातला सामन्यात टिकून राहण्यासाठी लवकरात लवकर विकेट्स काढण्याची गरज आहे.

20:05 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: पावरप्लेमध्ये सीएसकेची शानदार फलंदाजी

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने दोन्ही बाजूंनी फिरकीपटूंना गोलंदाजी दिली आहे. पॉवरप्लेमध्ये गुजरातला कोणतेही यश मिळालेले नाही. ६ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या बिनबाद ४९ धावा आहे. गायकवाड ३३ धावा करून खेळत आहे.

20:00 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसकेची शानदार सुरुवात, चार षटकानंतर धावसंख्या बिनबाद ३१

चार षटकांचा खेळ संपला. सीएसकेने चार षटकात कोणतेही नुकसान न करता ३१ धावा केल्या आहेत. गायकवाड १९ धावा करून खेळत आहे. कॉनवेने १० धावा केल्या आहेत. आतापर्यंत गुजरात टायटन्सचे गोलंदाज एकही बळी घेऊ शकलेले नाहीत.

19:53 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: ऋतुराजने जीवनदानाचा फायदा उचलला

दर्शनने नो बॉल टाकून ऋतुराज गायकवाडची विकेट घेण्याची संधी गमावली. त्यानंतर फ्री हिटवर षटकार ठोकल्यानंतर चौकार मारून जळजळीत मीठ चोळले. चेन्नईने ३ षटकात एकही विकेट न गमावता २३ धावा केल्या आहेत.

19:46 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: ऋतुराज गायकवाडला दुसऱ्याच षटकात मिळाले जीवदान

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने अप्रतिम सुरुवात केली आहे. ऋतुराज गायकवाड यांना सुरुवातीलाच जीवदान मिळाले. दर्शन नळकांडेच्या चेंडूवर शुबमन गिलने झेल टिपला आणि चेंडू नो बॉल होता. गुजरात संघाला विकेट मिळाली नाही, पण ऋतुराजने फ्री हिटवर षटकार नक्कीच मारला. दोन षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या १८ धावा. गायकवाड ११ चेंडूत १४ धावा करून खेळत आहे. या धोकादायक जोडीला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी गुजरातची नजर असेल.

19:40 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसकेने फलंदाजीला सुरुवात

पहिल्या क्वालिफायरमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी सुरू झाली आहे. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने पहिले षटक आणले. या षटकात ४ धावा आल्या.

19:37 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसकेने फलंदाजीला सुरुवात केली

पहिल्या क्वालिफायरमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी सुरू झाली आहे. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने पहिले षटक आणले. या षटकात ४ धावा आल्या.

Qualifier 1, CSK vs GT Match Highlights: क्वालिफायर १, सीएसके विरुद्ध जीटी हायलाइट्स:

गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.