IPL 2023, CSK vs GT Qualifier 1 Highlights: चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला आहे. यंदाच्या हंगामात सीएसके हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, गुजरातला केवळ १५७ धावाच करता आल्या. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.

गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलने ३८ चेंडूत ४२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. मात्र, राशिद खानने शेवटच्या षटकात १६ चेंडूत ३० धावांची झटपट खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईक़डून गोलंदाजी करताना दीपक चहर व्यतिरिक्त महिश तिक्ष्णा, रवींद्र जडेजा आणि महिषा पथिराना यांनी २-२ विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेला एक विकेट मिळाली.

वास्तविक बुधवारी एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा प्रवास संपणार आहे. मात्र, या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Live Updates
Qualifier 1, CSK vs GT Match Highlights: क्वालिफायर १, सीएसके विरुद्ध जीटी मॅच हायलाईट्स:
19:24 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. कारण ३० एप्रिल रोजी चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला होता. या सामन्यात चेन्नईने ४ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या होत्या. त्याचवेळी पंजाबने २०१ धावा केल्या होत्या.

19:19 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तिक्ष्णा

19:17 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग इलेव्हन

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी

19:09 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली

क्वालिफायर एक मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.

18:55 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: धोनीला चेपॉकमध्ये मिळतो जबरदस्त पाठिंबा

चेपॉकमध्ये धोनीला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळतो. धोनीचा हा शेवटचा सीझन असू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देखील धोनीला चेन्नईच्या मैदानावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळणार आहे.

18:53 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: चेपॉकमध्ये नाणेफेक महत्त्वाची ठरणार

चेपॉक येथे होणार्‍या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ७ सामने मैदानावर खेळले गेले आहेत. दुसऱ्या डावात दव आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला येथे लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल. ७ पैकी ४ सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध गुजरात टायटन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने झाले असून ते सर्व टायटन्सने जिंकले आहेत. अशा स्थितीत हार्दिक पांड्याला आज विजयाचा चौकार मारायला आवडेल.

18:49 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सर्वांच्या नजरा जडेजा आणि धोनीवर असतील

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात तणावाचे वातावरण होते. या सामन्यानंतर रवींद्र जडेजानेही रहस्यमय ट्विट केले आहेत. आजच्या सामन्यात सीएसकेच्या सर्व चाहत्यांची नजर दोन्ही खेळाडूंवर असेल.

18:42 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: विजय शंकर हा गुजरातसाठी ट्रम्प कार्ड ठरत आहे

या हंगामात विजय शंकरने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. गुजरातसाठी विजय शंकरने या मोसमात सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे शंकर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही दिसू शकतो.

18:40 (IST) 23 May 2023
CSK vs GT Qualifier 1: घरच्या मैदानावर चेन्नईची कामगिरी निराशाजनक

चेन्नईने या मोसमात घरच्या मैदानावर एकूण सात सामने खेळले आहेत. सातपैकी संघाने चार सामने जिंकले असले, तरी त्यांचा खेळ फारसा नेत्रदीपक झाला नाही. या मैदानावरील शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

18:36 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसके समोर शुबमन गिलला रोखण्याचे आव्हान

शुबमनने गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावून विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरवली. कारण आरसीबीचा संघ गुजरातकडून पराभूक होऊन प्लेऑफमधून बाहेर पडला. अशा परिस्थितीत चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा या युवा फलंदाजाकडे असतील. भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीकडे त्याच्यासाठी निश्चितच खास रणनीती असेल.

18:30 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: क्वालिफायरचा पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघांतील पहिला क्वालिफायर सामना पावसामुळं रद्द झाला, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. म्हणजेच गुजरात टायटन्सचा संघ फायनल खेळण्यासाठी पात्र ठरेल. कारण फक्त फायनल सामन्यासाठीच एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

18:14 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल

चेपॉकववर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असले तरी मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये येथे २०० हून अधिक धावा झाल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये स्कोअरिंग रेट निश्चितच कमी झाला आहे. अशा स्थितीत आजही फिरकी खेळपट्टी पाहायला मिळते. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतो. येथील मैदानावर धावांचा पाठलाग करताना संघ बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. चेपॉक येथे या मोसमात एकूण सात सामने खेळले गेले. ज्यामध्ये चेन्नईने चार जिंकले आणि तीन हरले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला.

18:10 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: गुजरात विरुद्ध चेन्नई हेड टू हेड आकडेवारी

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. गुजरातने तीनही वेळा विजय मिळवला. हे सामने ब्रेबॉर्न, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले. त्याचवेळी चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने असतील.

18:03 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: सीएसकेची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी

वर्ष २००८ – अंतिम फेरीत पराभूत

वर्ष २००९ – उपांत्य फेरीत हरले

वर्ष २०१० – विजेतेपद पटकावले

वर्ष २०११ – विजेतेपद पटकावले

वर्ष २०१२ – अंतिम फेरीत पराभूत

वर्ष २०१३ – अंतिम फेरीत पराभूत

वर्ष २०१४ – क्वालिफायर-२ हरले

वर्ष २०१५ – अंतिम फेरीत पराभूत

वर्ष २०१६ – बंदीमुळे संघ खेळला नाही

वर्ष २०१७ – बंदीमुळे संघ खेळला नाही

वर्ष २०१८ – विजेतेपद पटकावले

वर्ष २०१९ – अंतिम फेरीत पराभूत

वर्ष २०२१ – विजेतेपद पटकावले

वर्ष २०२२ – प्लेऑफसाठी पात्र ठरले नाही

17:39 (IST) 23 May 2023
GT vs CSK Qualifier 1: चेन्नईची आतापर्यंतची प्लेऑफमधील आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत आयपीएल क्वालिफायरमध्ये ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ जिंकले आहेत. त्याचबरोबर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सने त्याना हरवले आहे. आयपीएल २०२३ च्या क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्ससाठी माही सेनेचे आव्हान अजिबात सोपे असणार नाही.

Qualifier 1, CSK vs GT Match Highlights: क्वालिफायर १, सीएसके विरुद्ध जीटी हायलाइट्स:

गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.