Gujarat Titans vs Chennai Super Kings Highlights: शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या शतकी तडाख्याच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नईवर विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मोहित शर्मा (३-३१) आणि राशीद खानच्या (२-३८) भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघाला ३५ धावांनी पराभव पत्करावा लागला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावांचा डोंगर उभारला तर चेन्नई सुपर किंग्जला ८ बाद १९६धावाच करता आल्या. या विजयासह गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीगमधील प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र, या विजयानंतर बीसीसीआयने कारवाई करत गिलसह संघाला दंड ठोठावला आहे.

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा गुजराचत संघाचा सीझनमधील दुसरा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा होता आणि यानंतर इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित ११  खेळाडूंना वैयक्तिकरित्या ६ लाख रुपये किंवा त्यांच्या  मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. गुजरातने गतविजेत्या चेन्नईचा पराभव करत आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतीत आपले स्थान कायम ठेवले आहे. टायटन्स आता १२ सामन्यांत १० गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. 

Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
BJP VS Congress Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल, काँग्रेसने केला ‘हा’ आरोप; नेमकं काय घडलं?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

हेही वाचा- GT vs CSK : साई सुदर्शनने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

शुभमन गिल (१०४) आणि साई सुदर्शन (१०३) या गुजरातच्या सलामीवीरांनी वादळी शतके पूर्ण केली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी करत जीटीला ३ बाद २३१ धावांचा डोंगर उभारून दिला. सीएसकेने पहिल्या तीन षटकांत तीन विकेट गमावल्या. डॅरिल मिशेल (६३) आणि मोईन अली (५६) यांनी १०९ धावांची भागीदारी रचली तरीही CSK २० षटकांत ८ बाद १९६ धावा करू शकला. या विजयासह गुजरात तळाच्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचली आहे. दरम्यान, चेन्नईचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेचा संघ गुण आणि नेट रनरेटच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सपेक्षा पुढे असला तरी सीएसकेचा पराभव संघासाठी आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला महागात पडला आहे.