Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Match Today: आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना मंगळवारी (२३ मे) सुरुवात झाली. आज क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान डॉट बॉलच्या जागी झाडाचा इमोजी दाखवण्यात आला आहे. बीसीसीआय आणि टाटांनी मिळून एक उपक्रम सुरु केला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या सीझनचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान डॉट बॉलऐवजी झाडाचा इमोजी दाखवत आहे. त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर डॉट बॉलच्या चिन्हाऐवजी झाड पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले, आम्ही तुम्हाला त्यामागील कारण सांगत आहोत.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल

खरं तर, बीसीसीआय आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी झाडे लावणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील प्ले ऑफच्या सामन्यातील प्रत्येक डॉट बॉलसाठी टाटा समूह आणि बीसीसीआय ५०० झाडं लावणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एकाच प्रश्न पडला आहे की संघासाठी धावा करायच्या का पर्यावरण संवर्धनासाठी डॉट बॉल खेळायचा? पॉवर प्ले मध्ये मोहम्मद शमीने डॉट बॉल टाकले आणि त्यामुळेच त्याने झाडे लावली असे म्हटले जाईल.

हार्दिकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यामागे दव असण्याची शक्यता वर्तवली. गुजरात संघात एक बदल, यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेला संघात स्थान देण्यात आले आहे. तो म्हणाला, “आम्ही गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये येण्यासाठी खूप मेहनत केली आहे पण कधीकधी तुमचा दिवस वाईट असू शकतो.”

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, “आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. कारण ओस पडण्याची शक्यता होती. आम्ही आमच्या भक्कम फलंदाजीचे समर्थन करतो. शेवटी तुम्ही तुमच्या खेळावर किती विश्वास ठेवता यावर अवलंबून आहे. ही विकेट पुढे जाऊन संथ होऊ शकते. पण गेल्या सामन्यात जसा दव पडल्याने सामना हातातून निसटला होता. चेन्नई संघात कोणताही बदल नाही. या मोसमात १०व्यांदा चेन्नई कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे. चेन्नईविरुद्धचे तिन्ही सामने गुजरातने पाठलाग करताना जिंकले आहेत.

हेही वाचा: WTC Final 2023: “माझं वय वाढलं आहे…”, आर. अश्विनने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी त्याच्या दुखापतीबाबत केला मोठा खुलासा

गुजरातला १७३ धावांचे लक्ष्य

क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला १७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर त्यांनी २० षटकांत सात गडी गमावून १७२ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने संघाकडून सर्वाधिक ६० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ४० धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने प्रत्येकी १७ -१७ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक धाव केली. चार चेंडूत नऊ धावा केल्यानंतर मोईन अली नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि राशिद खानला प्रत्येकी एक यश मिळाले.

Story img Loader