Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 Match Today: इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये, यष्टीरक्षक फलंदाज दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. इशानला ही दुखापत किपिंग करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना झाली नाही, पण त्याचाच सहकारी ख्रिस जॉर्डनच्या कोपराने दुखापत झाली. वास्तविक, जॉर्डन षटक संपवून क्षेत्ररक्षणाला परत जात असताना त्याच्या हाताचा कोपरा इशानच्या डोळ्याजवळ लागला आणि त्याला दुखापत झाली. या कारणास्तव तो मैदान सोडून गेला.
इशान किशनच्या जागी विष्णू विनोद १६व्या षटकानंतर विकेटकीपिंगसाठी मैदानात आला. मात्र, नंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला अनफिट घोषित केले, त्यामुळे तो फलंदाजीसाठी मैदानातही उतरू शकला नाही. अशा परिस्थितीत इशानच्या जागी विष्णू विनोद फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. गुजरात टायटन्सनच्या २३३ धावांचा पाठलाग करताना त्यांचे दोन फलंदाज २९ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यात इशान किशनला दुखापतीमुळे फलंदाजीला येता नाही आले आणि कॅमेरून ग्रीनही दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. एमआय पलटणची अवस्था म्हणजे ‘ऐन लढाईत तोफेत पाणी’अशी झाली.
रोहित शर्माचा फॉर्म हा खूप मोठा चिंतेचा विषय ठरला त्याची बॅट आजच्या सामन्यातही चालली नाही. तिसऱ्या षटकात तो मोहम्मद शमीने बाद केला. रोहित सिक्स मारण्याच्या प्रयत्नात जोशुआ लिटल बाऊंड्रीवर झेलबाद झाला. रोहितने सात चेंडूंत आठ धावा केल्या. त्याने चौकार मारला. मुंबईने तीन षटकांत दोन गडी बाद २९ धावा केल्या आहेत.
मुंबईला एकापाठोपाठ एक वाईट धक्के बसतचं होते. किशन दुखापत झाल्यानंतर मुंबई सावरते न सावरते तोच कॅमेरून ग्रीन ३ चेंडूत ४ धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या भात्यातील बाउन्सर नावाचे अस्त्र ग्रीनला महागात पडले. चेंडू जोरात ग्रीनच्या हातावर आदळला अन् त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. ४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झालेला कॅमेरून ग्रीन फलंदाजीसाठी परतला आहे. जोशुवा लिटिलने १२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनला क्लीन बोल्ड केले. ग्रीन २० चेंडूत ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. इशान फलंदाजीला येणार नसल्याचे फ्रँचायझीने जाहीर केले अन् कन्कशन सबस्टीट्यूड म्हणून विष्णू विनोद फलंदाजीला येणार आहे.